क्रिकेट विश्वात आपली ऐतिहासिक कामगिरी बजावणारा हिटमॅन रोहित शर्मा आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आला आहे. नुकतीच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरुन टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर मनोरंजन विश्वातही आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.
आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि दमदार कामगिरीने कोट्यवधी चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारा ‘हिटमॅन’ लवकरच एका नव्या टीव्ही शोमध्ये दिसणार आहे. त्यामुळे रोहितच्या चाहत्यांसाठी ही नवी आणि खास पर्वणी ठरणार आहे. रोहित शर्मा आणि सोनी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
ज्यामध्ये त्याने त्याच्या शोचा टीझर चाहत्यांना़ दाखवला आहे. यामध्ये रोहित शर्मा त्याच्या एका शूटींगच्या लोकेशनला दिसत आहे. त्यामध्ये तो इतरांशी संवाद साधताना दिसून येत आहे. यावेळी तो त्याचा मैदावरील प्रसिद्ध झालेला डॉयलॉग ‘नो वन विल रोम इंन द गार्डन’ बोलत योग्य चित्रिकरण कसे येईल, याचा सल्ला देताना दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान, रोहित शर्माने या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर करत ‘Stage ready. Cameras ready. See you soon. ‘ असं कॅप्शनही दिलं आहे. त्यामुळे रोहित शर्मा चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा शो नेमका कधी प्रदर्शित होणार. त्याचे नाव काय असणार या सर्व गोष्टींबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरुन टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर 138 धावांची खेळी खेळत ऐतिहासिक शतक झळकावलं होतं. रोहितच्या या शतकापूर्वी हिटमॅनचा हा सामना शेवटचा असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. परंतू त्याच्या खेळीनंतर रोहितची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आणि तो 2027 चा वर्ल्डकप खेळणार अशा चर्चा सुरु झाल्या.