Smriti Mandhana : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये टीम इंडियाची धूम, पण स्मृती मानधना गायब ! चाहत्यांच्या मनात शंकांची पाल चुकचुकली

संपूर्ण टीम कपिलच्या मंचावर असताना स्मृतीची अनुपस्थिती ही केवळ योगायोग आहे की एखादी मोठी घटना, यावर आता चर्चा रंगू लागली आहे.<br/>
Smriti Mandhana : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये टीम इंडियाची धूम, पण स्मृती मानधना गायब ! चाहत्यांच्या मनात शंकांची पाल चुकचुकली

Smriti Mandhana : नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या चौथ्या सीझनचा नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या भागात भारतीय महिला क्रिकेट संघ पाहुणा म्हणून उपस्थित आहे. मात्र, चाहत्यांच्या नजरा ज्या खेळाडूला शोधत होत्या, ती स्टार फलंदाज स्मृती मानधना या ट्रेलरमधून गायब असल्याचे दिसून आले. संपूर्ण टीम कपिलच्या मंचावर असताना स्मृतीची अनुपस्थिती ही केवळ योगायोग आहे की एखादी मोठी घटना, यावर आता चर्चा रंगू लागली आहे.

ट्रेलरमध्ये कोणाची उपस्थिती?

रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरसह रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, हरलीन देओल, राधा यादव आणि प्रतिका रावल हे खेळाडू दिसत आहेत. इतकेच नाही तर मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार देखील कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा यांच्यासोबत धम्माल करताना दिसत आहेत. मात्र, स्मृती मानधना या संपूर्ण ट्रेलरमध्ये कुठेही दिसली नाही.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy 2025 : मैदानावर काळजाचा ठोका चुकला! झेल घेताना मुंबईचा 'हा' स्टार खेळाडू गंभीर जखमी

अनुपस्थितीचे कारण काय?

स्मृती मानधना या शोमध्ये का दिसली नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, काही तर्कवितर्क लढवले जात आहेत. स्मृतीचे संगीतकार पलाश मुच्छलसोबतचे लग्न तुटले. कदाचित त्यामुळे तिने या शूटिंगला वेळ दिला नसावा. काही चाहत्यांच्या मते, शूटिंगच्या वेळी ती उपलब्ध नसावी किंवा काही दुर्दैवी वैयक्तिक कारणास्तव तिने शोमध्ये हजेरी लावली नसावी.  

हेही वाचा – Year Ender 2025 : 2025 मध्ये 'हे' खेळाडू गुगलवर सर्वाधिक चर्चेत! गुगलच्या सर्च यादीत कोणाचे वर्चस्व? जाणून घ्या

स्मृतीची मैदानातील कामगिरी खालावली?

एकीकडे शोमधील अनुपस्थिती चर्चेत असतानाच, मैदानावरही स्मृतीच्या बॅटमधून धावा निघत नसल्याचे दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सध्याच्या टी-20 मालिकेत तिने केवळ 25 आणि 14 धावा केल्या आहेत. गेल्या पाच डावांमध्ये तिला पन्नास धावांचा टप्पाही पार करता आलेला नाही. आगामी WPL मध्ये आरसीबीला विजेतेपद मिळवून देणे आणि विश्वचषक जिंकणे हे तिचे पुढचे मोठे ध्येय आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version