Salary Hike 2026 : खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष पगारातील वाढीच्या दृष्टीने सकारात्मक ठरणार आहे. 'ईवाय' (EY) च्या 'फ्युचर ऑफ पे 2026' या ताज्या अहवालानुसार, भारतीय कंपन्या यावर्षी पगारात सरासरी 9.1 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये ही वाढ 8.9 टक्के इतकी होती. विशेष म्हणजे, जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात होणारी ही पगारवाढ सर्वाधिक असणार आहे.
कौशल्य आणि कामगिरीला मिळणार प्राधान्य
कंपन्या आता पगारवाढ देताना केवळ अनुभव किंवा पदाचा विचार न करता कर्मचाऱ्याचे कौशल्य (Skills) आणि कामगिरी (Performance) यावर भर देत आहेत. अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत –
स्किल-बेस्ड पे: जवळपास 50 टक्के कंपन्यांनी आता कौशल्य-आधारित वेतन प्रणाली स्वीकारली आहे किंवा ती लागू करण्याच्या तयारीत आहेत.
परफॉर्मन्स लिंक: कर्मचाऱ्याने कंपनीला दिलेले रिझल्ट्स आणि त्याची उपयुक्तता यावरच आता इन्क्रिमेंट अवलंबून असेल.
रीस्ट्रक्चरिंग: अनेक संस्था आपले कंपनसेशन फ्रेमवर्क बदलत असून बिझनेस प्रायोरिटीनुसार बदल करत आहेत.
कोणत्या क्षेत्रात किती पगारवाढ मिळणार?
यावर्षी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) पगारवाढीत आघाडीवर राहतील. विविध क्षेत्रांमधील अंदाजित वाढ खालीलप्रमाणे आहे:
– ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC): सरासरी 10.4 टक्के वाढ.
– डिजिटल, टेक्नॉलॉजी आणि फायनान्स: सुमारे 10 टक्के वाढ.
– ई-कॉमर्स: अंदाजे 9.9 टक्के वाढ.
– लाईफ सायन्सेस आणि फार्मास्युटिकल्स: सुमारे 9.7 टक्के वाढ.
नोकरी सोडण्याचे प्रमाण (Attrition) घटले
रिपोर्टनुसार, कर्मचारी आपली नोकरी बदलण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे, जे बाजारातील स्थिरतेचे लक्षण आहे:
– एट्रिशन रेट: 2024 मध्ये हा दर 17.5 टक्के होता, जो 2025 मध्ये घटून 16.4 टक्के वर आला आहे.
– स्वयंस्फूर्तीने राजीनामा: सुमारे 80 टक्के कर्मचारी स्वतःहून नोकरी सोडत आहेत, याचा अर्थ ते छाटणीमुळे नाही तर चांगल्या संधीसाठी बाहेर पडत आहेत.
– क्षेत्रानुसार एट्रिशन: फायनान्स सेक्टरमध्ये सर्वाधिक 24 टक्के एट्रिशन आहे, तर GCC मध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजे 14.1 टक्के आहे.
जागतिक स्तरावर भारताचा दबदबा
भारतातील 9.1 टक्के पगारवाढ ही अमेरिका (4.3 टक्के), युनायटेड किंगडम (4.1 टक्के), चीन (4.8 टक्के) आणि जपान (3.7 टक्के) यांसारख्या विकसित देशांच्या तुलनेत दुप्पट आहे. भारताचा GDP ग्रोथ रेट देखील 2026 मध्ये सुमारे 6.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे, तर अनेक प्रगत देशांमध्ये तो 2 टक्के पेक्षा कमी आहे. हे आकडे स्पष्ट करतात की भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून प्रतिभेला (Talent) मोठी मागणी आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.