MS Dhoni Video Viral : धोनीच्या गाडीत ‘ते’ पाकीट पाहून चाहते नाराज! सलमान खानच्या पार्टीला जातानाचा व्हिडीओ व्हायरल

सलमान खानच्या पार्टीतले त्याचे फोटो आधीच व्हायरल झाले होते, पण या व्हिडीओने मात्र वेगळेच वळण घेतले आहे. अनेकजण धोनीला आदर्श मानत असल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला आहे.
MS Dhoni Video Viral : धोनीच्या गाडीत ‘ते’ पाकीट पाहून चाहते नाराज! सलमान खानच्या पार्टीला जातानाचा व्हिडीओ व्हायरल

MS Dhoni Video Viral : भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि करोडो तरुण ज्याला स्वतःचा आदर्श मानतात, अशा महेंद्रसिंग धोनीचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना काढण्यात आलेल्या या व्हिडीओने धोनीच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे.

नेमका प्रकार काय?
नुकताच सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला धोनी आपली पत्नी साक्षीसोबत हजर राहिला होता. धोनी ज्यावेळी गाडीतून पार्टीच्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा फोटोग्राफर्सनी त्याला कॅमेरात कैद करण्यासाठी एकच गर्दी केली होती. याच दरम्यान एका कॅमेरामॅनने गाडीच्या आतील दृश्यांचा व्हिडीओ टिपला. या व्हिडीओमध्ये धोनी पुढच्या सीटवर बसून सीट बेल्ट लावताना दिसत आहे, तर त्याची पत्नी साक्षी मागच्या सीटवर बसलेली आहे.

हेही वाचा – Sonam Yeshey World Record : 22 वर्षीय गोलंदाजाचा विश्वविक्रम! 8 विकेट्स घेणारी जगातील पहिली गोलंदाज ठरली

व्हिडीओत दिसलेली ‘ती’ वादग्रस्त वस्तू
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये लोकांचे लक्ष वेधून घेतले ते एका पाकिटाने. धोनीची पत्नी साक्षी आणि तिच्या बाजूला बसलेली व्यक्ती यांच्यामध्ये एक सिगारेटचे पाकीट उघडपणे ठेवलेले पाहायला मिळत आहे. धोनी हा आपल्या फिटनेससाठी आणि शिस्तीसाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत त्याच्या कारमध्ये सिगारेटचे पाकीट दिसल्याने क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पण हे सिगारेटचं पाकीट नेमकं आहे तरी कुणाचं, याचं उत्तर मात्र अजून सापडलेलं नाही.

चाहत्यांची नाराजी आणि सोशल मीडियावर चर्चा
धोनीला अनेकजण आपला ‘रोल मॉडेल’ मानतात. त्यामुळे एका खेळाडूला न शोभणारी गोष्ट त्याच्या गाडीत आढळल्याने सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींच्या मते ते पाकीट धोनीचे नसून गाडीत बसलेल्या इतर कोणाचे तरी असू शकते. मात्र, या एका व्हिडीओमुळे धोनीच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – IND vs SL Women’s T20 : स्मृती-शफालीचा जागतिक विक्रम! T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली जोडी

फिटनेस आयकॉनवर प्रश्नचिन्ह?
सलमान खानच्या पार्टीतले त्याचे फोटो आधीच व्हायरल झाले होते, पण या व्हिडीओने मात्र वेगळेच वळण घेतले आहे. हे पाकीट नक्की कोणाचे होते आणि ते तिथे कसे आले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

क्रिकेट हा ‘सभ्य’ गृहस्थांचा खेळ आहे, असे म्हटले जाते. अर्थात हा इंग्लिश खेळ असल्याने या सभ्यतेच्या व्याख्येत काय बसते आणि काय नाही, याविषयी फारशी स्पष्ट माहिती नाही. मात्र, मैदानावरील कामगिरीमुळे अनेकांचा आदर्श बनलेल्या धोनीला त्याच्या वैयक्तिक जीवनातील काही बाबींबरून लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे

धोनी हा हुक्का ओढतो, असे म्हटले जात होते. आता त्याच्या गाडीत सिगारेटचं पाकीट सापडल्यामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
अशा प्रकारे ट्रोल केला जाणारा धोनी हा काही पहिलाच खेळाडू नाही. तसेच, अनेक बॉलीवूड स्टार्सनाही अशा गोष्टींवरून यापूर्वी ट्रोल केले गेले आहे किंवा विविध प्रकारे टीकेचा सामनाही करावा लागलेला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version