ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला मॅके येथे सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिल्याच पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या गोलंदाजांच्या मदतीने बांगलादेशचा महाल पत्त्यांसारखा कोसळला. एकीकडे मिलेच स्टार्कची आग ओकणारी बॉलिंग तर दुसरीकडे त्याला पॅट कमिन्स अन् जॉस हेझलवूड यांनी चांगली साथ मिळाली. स्टार्कने सुरुवातपासूनच बांगलादेशचा दणका उडवत 10 ओव्हर टाकल्या अन् 6 विकेट्स नावावर केल्या.
पहिल्या कसोटीत बांगलादेशकडून झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियने बांगलादेशला अवघ्या 64 धावांवर ऑलआऊट केलं. यावेळी मिचेल स्टार्कने या सामन्यात एक एक विकेटसाठी मैदानावर आपला जीव ओतून टाकल्याचे पाहायला मिळाले. डावातील पहिल्याच चेंडूवर स्टार्कने शादमान इस्लामला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने तन्जीद हसनला बाद केले. यानंतर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोसह पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने मोमिनुल हकला माघारी फिरवलं. यानंतर त्याने लिटन दासला देखील सोडलं नाही.
यावेळी बांगलादेशची अवस्था केवळ 12 धावांत 5 विकेट अशी झाली होती. यानंतर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी स्टार्कची धुरा सांभाळली. ज्याप्रमाणे स्टार्कने आल्यापासून बांगलादेशच्या फलंदाजांमध्ये आपला कहर माजवून ठेवला होता त्याचप्रमाणे पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी देखील आपली कामगिरी चोख पार पाडण्याची संधी सोडली नाही. कमिन्सने मुशफिकुर रहीमचा 12 धावांवर फडशा पाडला. तर कमिन्सने मिराजलाही जास्त वेळ मैदानात राहू दिले नाही.
कमिन्स एवढ्यावर थांबला नाही त्याने बांगलादेशला सातवा धक्का दिल्यानंतर हेझलवूडने हसन महमूदला बाद केल्याचे पाहून नवव्या विकेटची वाट पाहिली, आणि अखेर कमिन्सने तस्किन अहमदला बाद करत बांगलादेशला नववा धक्का दिला. बांगलादेशचा डाव पाहिला तर धावफलक एखाद्या मोबाईल क्रमांकासारखा दिसत होता. संघाच्या चारच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. एकवेळ तर बांगलादेशचा संघ 50 धावांच्या आतच गारद होईल असे चित्र होते. मात्र, अखेरच्या विकेटसाठी तैजुल इस्लाम आणि शोरिफुल इस्लाम यांनी थोडा संघर्ष करत संघाला 50 धावांचा टप्पा ओलांडून दिला.