Dussera Shopping : GST कपातीचा फायदा, सणासुदीच्या काळात ‘बाईकच्या EMI’मध्ये Maruti ची कार; खरेदीसाठी शोरूमध्ये रांगा

मारुती सुझुकी कंपनी सध्या आपल्या छोट्या वाहनांच्या विक्रीवर अधिक भर देत आहे. कंपनीच्या अनेक गाड्यांच्या किमती कमी झाल्यामुळे कमी EMI वर कार देणे शक्य झाले आहे.
Dussera Shopping : GST कपातीचा फायदा, सणासुदीच्या काळात ‘बाईकच्या EMI’मध्ये Maruti ची कार; खरेदीसाठी शोरूमध्ये रांगा

Dussera Car Purchase : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराच्या (GST) स्लॅबमध्ये कपात केल्यामुळे ऑटो उद्योगात त्याचे मोठे आणि सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. सणासुदीच्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केली. देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने जीएसटी कपात आणि नवरात्री उत्सवाचे औचित्य साधत विक्रमी विक्री केली आहे. विशेष म्हणजे, मारुतीने दररोज तब्बल 80 हजाराहून अधिक वाहनांची विक्री नोंदवली आहे.

1999 रुपये EMI ची आकर्षक ऑफर
मारुती सुझुकीने जीएसटी कपात आणि नवरात्रीचा उत्साह लक्षात घेऊन ग्राहकांसाठी एक खास आणि अतिशय आकर्षक ऑफर आणली होती. कंपनीने कार खरेदीसाठी फक्त 1999 रुपये महिना (EMI) अशी ऑफर दिली, ज्यामुळे कार खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली. 'बाईकच्या EMI मध्ये कार' मिळत असल्यामुळे लोकांनी शोरूम्सबाहेर मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा – Sahara Group Companies : अदानींना विकणार सहारा ग्रुप आपल्या कंपन्या! सर्वोच्च न्यायालयाला मागितली परवानगी

सर्वात स्वस्त S-Presso ची किंमत झाली कमी
मारुती सुझुकीची S-Presso ही कार सध्या कंपनीची सर्वात स्वस्त कार ठरली आहे. या कारची किंमत आता 3.50 लाख रुपये इतकी झाली आहे. फेस्टिव्हल सीझनमध्ये कंपनीने याच कारवर 1999 रुपये EMI ची ऑफर आणली. जीएसटी कपातीमुळे या कारच्या किमतीत तब्बल 1.29 लाख रुपयांची घट झाली आहे. GST दरातील कपातीचा फायदा 4 मीटरपेक्षा लहान असलेल्या कार्सना मिळाला आहे.

विक्रीचा विक्रम आणि ऑफर्सची मुदत
मारुती सुझुकी कंपनी सध्या आपल्या छोट्या (Entry Level) वाहनांच्या विक्रीवर अधिक भर देत आहे. कंपनीच्या अनेक गाड्यांच्या किमती कमी झाल्यामुळे कमी EMI वर कार देणे शक्य झाले आहे. मारुती सुझुकीने आपल्या एंट्री लेव्हल गाड्यांवर 24 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. ही आकर्षक ऑफर 31 डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे. 22 सप्टेंबरपासून GST दरात कपात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मारुतीने तब्बल 25,000 कारची डिलिव्हरी केली. त्यानंतर नवरात्रीच्या दिवशी 80,000 वाहनांची विक्री करून कंपनीने नवा विक्रम स्थापित केला.

हेही वाचा – Dollar Rupee Salary Hike: नोकरी तीच तरीही अचानक पगारवाढ? डॉलर-रुपया घसरणीचा जॅकपॉट! परदेशी भारतीयांचा पगार लाखोंनी वाढला

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version