Lionel Messi India Tour 2025: लिओनेल मेस्सीला भारत दौऱ्यासाठी द्यावे लागले ‘इतक्या’ कोटींचे मानधन; आयोजकाचा खळबळजनक खुलासा

या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मेस्सीला नेमकी किती रक्कम देण्यात आली, याचा उलगडा या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सतद्रु दत्ता यांनी अटकेनंतर केला आहे.<br/>
Lionel Messi India Tour 2025: लिओनेल मेस्सीला भारत दौऱ्यासाठी द्यावे लागले ‘इतक्या’ कोटींचे मानधन; आयोजकाचा खळबळजनक खुलासा

Lionel Messi India Tour 2025: फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सीचा 'इंडिया GOAT टूर 2025' हा दौरा केवळ चाहत्यांच्या गर्दीमुळेच नाही, तर आता झालेल्या मोठ्या आर्थिक खुलाशामुळे चर्चेत आला आहे. या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मेस्सीला नेमकी किती रक्कम देण्यात आली, याचा उलगडा या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सतद्रु दत्ता यांनी अटकेनंतर केला आहे.

मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क 

आयोजक सतद्रु दत्ता यांनी एसआयटी (SIT) चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, लिओनेल मेस्सीला या दौऱ्यासाठी तब्बल 89 कोटी रुपये मानधन म्हणून देण्यात आले होते. याशिवाय, भारत सरकारला कर (Tax) म्हणून 11 कोटी रुपये भरण्यात आले. म्हणजेच, मेस्सीला भारतात आणण्यासाठी एकूण 100 कोटी रुपयांचा अवाढव्य खर्च करण्यात आला.

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्मा घेणार होता निवृत्ती? 2023 विश्वचषकानंतरच्या 'त्या' निर्णयावर रोहितचा मोठा खुलासा

खर्चाचे गणित कसे होते?

खर्च केलेल्या रकमेपैकी 30 टक्के रक्कम प्रायोजकांकडून मिळाली असल्याचेही उघड झाले आहे, तर 30 टक्के रक्कम तिकिट खरेदीतून जमा झाली आहे. एसआयटी अधिकाऱ्यांनी दत्ताच्या गोठवलेल्या बँक खात्यांमधून 20 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वसूल केली.

कोलकात्यात मेस्सी लवकर निघून गेल्याने चाहत्यांमध्ये गोंधळ  

दौऱ्याची सुरुवात कोलकात्यातून झाली होती. विमानतळावर मेस्सीचे जंगी स्वागत झाले आणि त्याने स्वतःच्या 70 फूट उंच पुतळ्याचे अनावरणही केले. मात्र, सॉल्ट लेक स्टेडियममधील कार्यक्रमात गोंधळ उडाला. स्टेडियममध्ये चाहत्यांनी गराडा घातल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मेस्सी कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेला.

हेही वाचा – IND vs PAK: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! अंडर-19 आशिया चषकात भारताचा पाकिस्तानकडून 191 धावांनी पराभव

चाहत्यांचा संताप आणि तोडफोड

मेस्सीची झलक पाहण्यासाठी हजारो रुपये खर्च केलेल्या चाहत्यांचा संयम सुटला. संतापलेल्या जमावाने स्टेडियममधील खुर्च्यांची मोडतोड केली आणि पाण्याच्या बाटल्या फेकून आपला निषेध व्यक्त केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनाही नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. याच गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सतद्रु दत्ता यांना कोलकाता विमानतळावर अटक करण्यात आली.

इतर शहरांत दौरा शांततेत

कोलकात्यातील कटू अनुभवानंतर मेस्सीने हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीला भेट दिली. या तिन्ही शहरांमध्ये त्याचे कार्यक्रम नियोजित पद्धतीने आणि कोणत्याही वादाविना शांततेत पार पडले. या दौऱ्यादरम्यान मेस्सीने भारतातील अनेक दिग्गजांची भेट घेतल्याने क्रीडा वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version