KKR vs PBKS IPL 2026 : घरच्या मैदानात केकेआर विजयाचा श्रीगणेशा करणार?, की पंजाब विजयाची हॅट्ट्रिक मारणार?; आजचा सामना ठरणार रंजक

आयपीएल 2026 चा बारावा सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात  होणार आहे. एकीकडे पंजाबने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत, तर दुसरीकडे कोलकाताने दोन्ही सामने गमावले आहेत.

KKR vs PBKS IPL 2026 : घरच्या मैदानात केकेआर विजयाचा श्रीगणेशा करणार?, की पंजाब विजयाची हॅट्ट्रिक मारणार?; आजचा सामना ठरणार रंजक

आयपीएल 2026 चा बारावा सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात  होणार आहे. एकीकडे पंजाबने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत, तर दुसरीकडे कोलकाताने दोन्ही सामने गमावले आहेत. पंजाबची तुलना अगदी कमी वेळात आयपीएलच्या बलाढ्य संघांसोबत केली जात आहे. रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यरच्या जोडीने पंजाब संघाचा कायापालट केला असं म्हणता येईल. कोलकाता विरुद्ध पंजाब सामना कोलकाताच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच कोलकाताच्या  ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे.

पंजाबचा गेल्या वर्षीचा हंगाम उत्तम गेला होता, तशीच सुरुवात पंजाब संघाने या वर्षी केली आहे. पंजाबने पहिल्या सामन्यात गुजरात आणि नंतर चेन्नईचा सुपडा साफ केला. पंजाबसाठी सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू आहेत. फलदाजी आणि गोलंदाजी पंजाब संघ उत्तम करत आहेत. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पंजाबने खराब क्षेत्ररक्षण केले. ती एक बाजू पंजाब सुधारण्याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा आहे. पंजाबचे सुरुवातीचे फलंदाज प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, कूपर कॉंनोली आणि श्रेयस अय्यर चांगली फलंदाजी करत आहेत, मात्र नेहल वढेरा, शशांक सिंग आणि मार्कस स्टोइनिस अजून रंगात आलेले दिसले नाहीत. पंजाबची गोलंदाजी उत्तम चालली  आहे, मार्को येनसन, अर्षदिप सिंग, विजयकुमार विशाक, झेवियर बार्टलेट आणि युजवेंद्र चहल यांनी दोन्ही सामन्यांत अप्रतिम गोलंदाजी केली,  वेळोवेळी विकेट्सदेखील घेतल्या. इतर संघांची गोलंदाजी किंवा फलंदाजी यापैकी एक मजबूत असते पण पंजाबची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ताकत आहे असं म्हटल्यास अजिबात वावगं ठरणार नाही. जर पंजाबचे मधल्या फळीतील फलंदाज चालेले तर पंजाबला रोखणं अशक्य होईल. 
 

हेही वाचा – SRH vs LSG IPL Match 2026: ऋषभ पंतची तुफान खेळी! हैदराबादच्या बालेकिल्ल्यात लखनौचा झेंडा; घरच्या मैदानावर सनरायझर्सला 5 विकेट्सनी चारली धूळ 

एकीकडे पंजाब सगळीकडून सुरळीत दिसत आहे, तर दुसरीकडे कोलकातासाठी कोणतीच गोष्ट चांगली होत नाही आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासमोर अनेक समस्या आहेत. पण, मुख्य खेळाडूंचा खराब फॉर्म ही सगळ्यात मोठी समस्या आहे. वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, रमनदीप सिंग आणि कॅमरुन ग्रीन अजून चांगल्या फॉर्ममध्ये दिसलेले नाहीत. त्यामुळे कोलकाताचा बॅलेन्स हलला आहे. कोलकातासाठी,
महत्वाचे ठरते ते म्हणजे योग्य प्लेयिंग इलेव्हन शोधणे. कॅमरून ग्रीनकडून कोलकाताच्या मोठ्या अपेक्षा आहेत. जर कॅमरुन ग्रीन चांगल्या फॉर्ममध्ये आला तर कोलकाताच्या बऱ्याच समस्या सुटतील. कोलकाता आणि चेन्नई अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. चेन्नईच्या तुलनेत कोलकाता संघ आणि निर्णय क्षमता चांगली दिसत आहे. एक विजय साध्य केल्यानंतर कोलकाताची विजयी घोडदौड सुरू होईल, अशी अपेक्षा कोलकाताच्या चाहत्यांना असेल.

खेळपट्टी आणि परिस्थिती – 

  • या हंगामात ईडन गार्डन्सवर झालेल्या एकमेव सामन्यात, SRH ने प्रथम फलंदाजी करताना 226 धावा केल्या.  रविवारी झालेल्या दोन्ही संघांच्या सरावावर सतत पडणाऱ्या पावसामुळे दोन्ही संघांच्या सरावात अडथळा आला, परंतु सामन्याच्या दिवशी हवामान चांगले असण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – RCB Vs CSK IPL 2026: CSK चं टेन्शन वाढलं! RCB ची विजयाची 'रॉयल' गर्जना, सलग तिसऱ्या पराभवानंतर चेन्नईची अवस्था बिकट 
हायलाईट्स – 

  • युजवेंद्र चहलने अजिंक्य रहाणे आणि रिंकू सिंग यांच्याविरुद्धच्या वर्चस्व गाजवले आहे. त्याने रहाणेला 45 चेंडूंमध्ये केवळ 46 धावा दिल्या असून त्याला चार वेळा बाद केले आहे, तर रिंकूला 19 चेंडूंमध्ये केवळ 15 धावा दिल्या असून त्याला दोनदा बाद केले आहे.
  • प्रभसिमरन सिंगने सुनील नारायण विरुद्ध चांगली फलंदाजी केली. प्रभसिमरन सिंगने  नारायण विरुद्ध 17 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या असून तो अद्याप त्याच्या गोलंदाजीवर बाद झालेला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number