John Cena Retires: जॉन सीनाची WWE मधून निवृत्ती; ‘नेव्हर गिव्ह अप’चा अध्याय संपला

सॅटरडे नाईट्स मेन इव्हेंट (SNME) मध्ये झालेला सामना हा त्याच्या तब्बल 20 वर्षांच्या शानदार कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. या ऐतिहासिक लढतीत सीनाचा सामना गुंथरशी झाला.<br/>
John Cena Retires: जॉन सीनाची WWE मधून निवृत्ती; ‘नेव्हर गिव्ह अप’चा अध्याय संपला

John Cena Retires: WWE च्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी सुपरस्टार्सपैकी एक असलेल्या जॉन सीनाने अखेर कुस्तीच्या रिंगला निरोप दिला आहे. सॅटरडे नाईट्स मेन इव्हेंट (SNME) मध्ये झालेला सामना हा त्याच्या तब्बल 20 वर्षांच्या शानदार कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. या ऐतिहासिक लढतीत सीनाचा सामना गुंथरशी झाला.

गुंथरविरुद्ध शेवटची लढत

शेवटच्या सामन्यात जॉन सीनाने आपल्या प्रसिद्ध ‘अॅटिट्यूड अॅडजस्टमेंट’ या ट्रेडमार्क मूव्हचा वापर करत सामना रंगवला. मात्र, गुंथरच्या दमदार खेळापुढे सीनाला अखेर ‘स्लीपर होल्ड’मध्ये अडकावे लागले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच जॉन सीनाने आत्मसमर्पण करत सामना सोडला, आणि याच क्षणी WWE युगाचा शेवट झाला.

हेही वाचा – Lionel Messi in Mumbai : Lionel Messi च्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज! वाहतूक नियंत्रणासाठी मोठे बदल

मैदानात पसरली शांतता, चाहत्यांकडून भावनिक निरोप

सामना संपताच संपूर्ण वातावरण काही क्षण शांत झाले. चाहत्यांना हा क्षण खरा आहे, यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर संपूर्ण स्टेडियम उभे राहून टाळ्यांच्या गजरात सीनाला मानवंदना देऊ लागले. जॉन सीनाने रिंगमधून बाहेर पडत रॅम्पवरून चालताना प्रत्येक चाहत्याचे अभिवादन स्वीकारले. या वेळी तो भावूक होत म्हणाला, “इतक्या वर्षांत तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी कायम ऋणी आहे. धन्यवाद WWE युनिव्हर्स.”

हेही वाचा – Vijay Hazare Trophy: विराट कोहली आणि ऋषभ पंत विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार; 'या' मैदानावर रंगणार सामना

आठवणींचा आढावा आणि निवृत्तीचे प्रतीक

यानंतर मोठ्या पडद्यावर जॉन सीनाच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण दाखवण्यात आले. अखेरीस सीनाने आपल्या बूट रिंगच्या मध्यभागी ठेवले, जे कुस्तीविश्वात निवृत्तीचे प्रतीक मानले जाते. हा क्षण पाहून अनेक चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. अनेक जागतिक विजेतेपदे, अविस्मरणीय सामने आणि “नेव्हर गिव्ह अप” या मंत्रासह जॉन सीनाने WWE मध्ये एक सुवर्णकाळ घडवला. त्याची जिद्द, मेहनत आणि प्रेरणादायी प्रवास लाखो चाहत्यांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे. जॉन सीनाचा वारसा WWE युनिव्हर्स कधीही विसरणार नाही.  
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version