Job Rule Change: नोकरी सोडणार आहात? 1 एप्रिलपासून Full and Final सेटलमेंटचे नियम बदलले; जाणून घ्या सविस्तर

1 एप्रिलपासून नोकरी सोडल्यानंतर 48 तासांत फुल अँड फायनल सेटलमेंट देणे बंधनकारक होणार आहे तसेच ग्रॅच्युइटी आणि पगार रचनेतही बदल होणार असून कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे

Job Rule Change: नोकरी सोडणार आहात? 1 एप्रिलपासून Full and Final सेटलमेंटचे नियम बदलले; जाणून घ्या सविस्तर

Job Rule Change: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. नोकरी सोडताना सर्वात मोठी चिंता असते ती ‘फुल अँड फायनल सेटलमेंट’ची. अनेकदा कर्मचारी कंपनी सोडल्यानंतरही आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठी महिनोनमहिने वाट पाहतात. मात्र आता या समस्येला मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन कामगार कायद्यांनुसार, कर्मचारी नोकरी सोडल्यानंतर कंपनीने त्याचे सर्व देयक केवळ 48 तासांत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये पगार, न वापरलेल्या सुट्ट्यांचे पैसे, बोनस किंवा इतर भत्ते यांचा समावेश असेल. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 45 ते 90 दिवस लागायचे, त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागायचा. आता मात्र हा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे.

हेही वाचा: Jet Fuel Rate: पश्चिम आशियातील युद्धाचा इंधनावर मोठा परिणाम; विमान प्रवास महागणार?

हा नियम सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. म्हणजेच तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला असेल, कंपनीने तुम्हाला कामावरून कमी केले असेल किंवा ले-ऑफ झाला असेल, तरीही कंपनीला 48 तासांच्या आत सेटलमेंट करणे आवश्यक असेल. जर कंपनीने हे नियम पाळले नाहीत, तर संबंधित कर्मचारी कामगार विभागाकडे तक्रार दाखल करू शकतो. याशिवाय उशीर झाल्यास व्याजाची मागणी करण्याचाही अधिकार कर्मचाऱ्याला असेल.

याचबरोबर ग्रॅच्युइटीसंबंधी नियमातही मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वी किमान 5 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतरच ग्रॅच्युइटी मिळत होती. मात्र आता नवीन नियमानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 1 वर्ष सेवा दिली असेल, तर तोही ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरू शकतो. ही रक्कम नोकरी सोडल्यानंतर 30 दिवसांच्या आत देणे आवश्यक असेल.

पगाराच्या रचनेतही बदल होणार आहेत. नवीन नियमानुसार, एकूण CTC मधील किमान 50 टक्के हिस्सा बेसिक सॅलरी म्हणून दाखवावा लागेल. यामुळे प्रोव्हिडंट फंड (PF) मध्ये जमा होणारी रक्कम वाढेल. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी बचत वाढेल. मात्र दुसरीकडे, PF वाढल्यामुळे हातात येणारा पगार थोडासा कमी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:iPhone Users Warning: आयफोन वापरकर्त्यांनो सावधान! हॅकर्सकडून डेटा चोरी? केंद्र सरकारकडून अलर्ट जारी

तज्ज्ञांच्या मते, या बदलांमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक हक्क अधिक मजबूत होणार आहेत. कंपन्यांची मनमानी थांबेल आणि कर्मचार्‍यांना वेळेवर पैसे मिळतील. त्यामुळे नोकरी बदलताना होणारी आर्थिक ओढाताण कमी होईल.

नोकरी सोडण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. नोटीस पिरियड पूर्ण करणे, आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करणे आणि कंपनीने नवीन नियम लागू केले आहेत का, याची खात्री करणे गरजेचे आहे.

1 एप्रिलपासून लागू होणारे हे नवे नियम कर्मचारी वर्गासाठी फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर नवीन आर्थिक वर्षाची वाट पाहणे तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number