Jemimah Rodrigues: भारतीय महिला क्रिकेट जगतातील दोन घट्ट मैत्रिणी स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याशी संबंधित एक भावनिक घटना समोर आली आहे. स्मृती मानधनाने वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे आपलं लग्न पुढे ढकललं होत. या कठीण प्रसंगी जेमिमा रॉड्रिग्जने घेतलेल्या निर्णयाने क्रीडा जगतात तिच्या संवेदनशीलतेची आणि मैत्रीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले
लग्नाच्या एक दिवस आधीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधन यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याने मानधाना कुटुंबाने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या घटनेने स्मृतीसह उपस्थित असलेल्या सर्व सहकाऱ्यांवर भावनिक परिणाम झाला.
जेमिमाची WBBL मधून माघार
जेमिमा रॉड्रिग्ज ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीग (WBBL) मध्ये ब्रिस्बेन हीट संघाचे प्रतिनिधित्व करत होती. ती आधीच भारतात स्मृतीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आली होती आणि नंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतण्याची तिची योजना होती. मात्र, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच, जेमिमाने तिच्या फ्रँचायझीला स्पष्ट कळवले की ती मैत्रिणीला या कठीण काळात एकटी सोडू शकत नाही. त्यामुळे तिने उर्वरित चार सामन्यांतून नाव मागे घेण्याची विनंती केली.
हेही वाचा – WPL Auction 2026: महिला प्रीमियर लीगचा पहिला मेगा लिलाव कधी, कुठे आणि कसा पाहता येईल?
ब्रिस्बेन हीट व्यवस्थापनाकडून जेमिमाच्या निर्णयाचा आदर
ब्रिस्बेन हीटचे सीईओ टेरी सेव्हनसन यांनी निवेदन जारी करताना जेमिमाच्या निर्णयाची दखल घेतली आणि सांगितले की तिची विनंती पूर्णपणे वैयक्तिक आणि भावनिक आहे. क्लबने तिचा निर्णय मान्य केला असून स्मृतीच्या वडिलांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. ़़
जेमिमाने या हंगामात फक्त तीन सामने खेळले असले तरी आता ती संपूर्ण वेळ स्मृती आणि तिच्या कुटुंबासाठी देत आहे. क्रीडा क्षेत्रात क्वचितच दिसणारी अशी मैत्री आणि मानवी मूल्यांचे सुंदर उदाहरण या प्रसंगातून समोर आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.