आयपीएलच्या 19 व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या मोसमाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघा एक दिवस उरला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व टीममध्ये खडाजंगी सामना पाहायला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून अनेक संघांनी आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. ज्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांनी 5-5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर्स संघाने 3 वेळा तर राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांनी प्रत्येकी 1 वेळा आयपीएलच्या हंगामात चॅम्पियन म्हणून भूमिका बजावली.
हेही वाचा- IPL 2026 : 14 वर्षाचा पठ्ठ्याचं थेट 'कॅप्टन कूल'च्या संघाला ओपन चॅलेंज, म्हणाला "दोन्ही सामन्यात सीएसकेला…"
तर गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये रजत पाटीदार याच्या नेतृत्वाखाली आरसीबी पुरुष संघाने 18 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा संपवत पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. या यशामुळे RCB ची लोकप्रियता आणखी वाढली. यावेळी केवळ आरसीबीच नव्हे तर आयपीएलमधील आणखी असे तीन संघ आहेत ज्यांच्या दीर्घकालीन प्रतिक्षेच फळ त्यांनी अजूनपर्यंत मिळालं नाही. हे तीन संघ म्हणजे लखनौ सुपर जांयट्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या तीन संघांनी आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपासून एकही ट्रॉफी जिंकली नाही.
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत असलेले पंजाब आणि दिल्ली तसेच 2022 साली पदार्पण केलेला संघ लखनौ यांच्यापैकी कोणत्या संघाचा दीर्घकालीन वनवास संपणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. दरम्यान आतापर्यंत पंजाबचं 2 वेळा तर दिल्लीचं एकदा आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलंय. किंग्स इलेव्हन पंजाब 2014 तर पंजाब किंग्स 2025 साली उपविजेता राहिली. तर दिल्ली कॅपिट्ल्स 2020 साली आयपीएल ट्रॉफीपासून 1 पाऊल दूर राहिली होती.यंदा हे तीन संघ कशी कामगिरी करतात तसेच यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरतय याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.