IPL 2026 Young Achievers : यंदाच्या IPL मध्ये हे अनकॅप्ड खेळाडू करू शकतात चमकदार कामगिरी, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले कोण आहेत हे खेळाडू ? जाणून घ्या

यंदाच्या IPL मध्ये हे अनकॅप्ड खेळाडू करू शकतात चमकदार कामगिरी, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले कोण आहेत हे खेळाडू ? जाणून घ्या<br/>

IPL 2026 Young Achievers : यंदाच्या IPL मध्ये हे अनकॅप्ड खेळाडू करू शकतात चमकदार कामगिरी, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले कोण आहेत हे खेळाडू ? जाणून घ्या

आयपीएलमध्ये नेहमीच नजर ही स्टार भारतीय खेळाडूंवर आणि विदेशी खेळाडूंवर नजर असते. जाहिराती, समाज माध्यमातील कन्टेन्ट पण त्यांच्या अवतीभवती बनवला जातो. एकंदरीतयाच स्टार खेळाडूंना महत्त्व दिलं जातं, पण सगळ्यांच्या भुवया उंचावतात ते म्हणजे अनकॅप्ड खेळाडू ज्यांच्याबाबतीत कोणालाच काही माहीत नसतं आणि कोणाला त्यांच्याकडून काही खास अपेक्षादेखील नसतात. मुकुल चौधरीने त्याच्या कामगिरीने सर्वांच्या नजरा त्याच्यावर फिरवल्या. ज्या कामाची अपेक्षा  चाहते रिषभ पंत, निकोलस पूरन, आयुष बडोनी आणि अब्दुल समद यांच्याकडून करतात, ते काम कोणी करून दाखवलं ? २१ वर्षांच्या मुकुल चौधरीने. मुकुल चौधरीप्रमाणे अजूनही खेळाडू आहेत, ज्यांना संधी मिळाल्यावर सर्वांना आश्चर्यचकित करू शकतात, तर कोण आहेत हे खेळाडू ? आपण जाणून घेऊया.

हेही वाचा  KKR vs LSG IPL 2026 : KKR घरच्या मैदानावर भिडणार LSG सोबत, सामना रंगणार की पुन्हा पावसाचं व्यत्यय येणार?; चाहत्यांची धाकधुक वाढली  

1. अनुकूल रॉय – 
अनुकूल रॉय हा झारखंडचा अष्टपैलू खेळाडू आहे, जो डावखुरा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज आहे. तसं तर अनुकूल 2018 पासून आयपीएल खेळत आहे., पण त्याला हवी तशी संधी मिळाली नाही आहे. पहिला मुंबई इंडियन्ससाठी खेळला आणि आता कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळत आहे. तो 2018 च्या U-19 वर्ल्ड कप जिंकलेल्या संघाचा भागदेखील होता. 2025/2026 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झारखंडला जिंकण्यात त्याचा ईशान किशन एवढाच हात होता कारण  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा तो मालिकावीर होता. 

2. प्रिन्स यादव –

लखनऊसाठी खेळणारा प्रिन्स यादव उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. दिल्लीच्या या वेगवान गोलंदाजाने सर्वांनाच त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केलं. त्याची तुलना मोहम्मद सिराज सोबत केली जात आहे. प्रिन्स त्याच्या 'आऊटस्विंग' आणि 'डेथ बॉलिंग'साठी ओळखला जातो. त्याने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील 'पुरानी दिल्ली 6' संघाकडून खेळताना, गोलंदाजीच्या शैलीत फारसा बदल न करता वेग बदलण्याच्या आपल्या क्षमतेने लक्ष वेधून घेतले. त्याने दहा सामन्यांमध्ये 13 बळी घेतले, ज्यामुळे त्याला दिल्ली रणजी संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली. तो नक्कीच भारतीय संघासाठी खेळताना दिसेल, असेदेखील म्हटलं जात आहे. 

हेही वाचा – Harbhajan Slaps Sreesanth Video Viral : हरभजनने श्रीसंतच्या लगावली कानशिलात! IPL मधील सर्वाधिक वादग्रस्त फाईट; 18 वर्षांनंतर अनकट फुटेज प्रसिद्ध

3. अर्जुन तेंडुलकर –
अर्जुन तेंडुलकर या नावाची काही खास ओळख करून द्यायची गरज नाही. अर्जुनाची तुलना त्याच्या वडिलांसोबत म्हणजेच भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासोबत केली जाते, त्याला समाज माध्यमांवर ट्रोलदेखील केलं जातं, पण कोणाचही नशीब बदलायला अजिबात वेळ लागत नाही. अर्जुन अष्टपैलू खेळाडू आहे जो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि  चांगली फलंदाजी करू शकतो. भरत अरुण आणि मोहम्मद शमीच्या प्रशिक्षणाचा त्याला नक्कीच फायदा होईल. जर त्याला लखनऊने संधी दिली तर तो नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो. 

४. ब्रिजेश शर्मा –
आयपीएल 2026 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने वेगवान गोलंदाज ब्रिजेश शर्माला 30 लाख रुपयांमध्ये  विकत घेतले.
लिलावाच्या आधी त्याने कोणत्याही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले नव्हते, पण 2025 च्या बंगाल प्रो टी20 लीगमधील आपल्या कामगिरीने त्याने लक्ष वेधून घेतले.त्याने सीएसकेविरुद्ध १८ धावा देऊन एक विकेट घेतलेली. त्याला भविष्यात राजस्थान अजून संधी देईलच. जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि संदीप शर्मा यांच्यासोबत तो कशी गोलंदाजी करतो हे नक्कीच बघण्यायोग्य असेल. 

5. अशोक शर्मा –
वेगवान गोलंदाज अशोक शर्माने राजस्थान रॉयल्ससाठी नेट बॉलर म्हणून काम केले, त्यानंतर 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने त्याला 55 लाख रुपयांना आयपीएलमध्ये करारबद्ध केले, पण त्याला KKR कडून खेळण्याची संधी मिळाली नाही आणि तो पुन्हा RR संघात परतला, ज्यांनी 2025 च्या मेगा लिलावात त्याला 30 लाख रुपयांना विकत घेतले. आणखी एक हंगाम बाहेर बसूनही, गुजरात टायटन्सने त्याला 2026 च्या हंगामापूर्वी 90 लाख रुपयांना विकत घेतले. अशोक त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. बॅटने तो तुडं फटकेबाजी करू शकतो. राजस्थान विरुद्ध त्याने 154.2 च्या गतीचा बॉल टाकला, त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला. 

6. सलील अरोरा –
सलील अरोरा हा पंजाबचा यष्टीरक्षक-फलंदाज आहे, ज्याने आपल्या पॉवर-हिटिंग क्षमतेचे प्रदर्शन करणाऱ्या एका उल्लेखनीय देशांतर्गत हंगामानंतर राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले.यष्टीरक्षण करण्यासोबतच वेगाने धावा काढण्यास सक्षम असलेल्या या उजव्या हाताच्या फलंदाजाला, आयपीएल 2026 च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने 1.5 कोटी रुपयांना करारबद्ध केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number