India vs South Africa T20I Series: भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सामना

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. तर आफ्रिकन संघाचे नेतृत्व एडेन मार्कराम करणार आहे.
India vs South Africa T20I Series: भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सामना

India vs South Africa T20I Series: भारतीय क्रिकेट संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या रोमांचक टी-20 मालिकेला सुरुवात करत आहे. एकदिवसीय मालिकेत 2-1 अशी दमदार बाजी मारल्यानंतर टीम इंडिया आत्मविश्वासात असून टी-20 विश्वचषक 2026 पूर्वी योग्य संघ संयोजन शोधण्यावर संघाचे लक्ष असेल.

सूर्यकुमार यादवकडे टीम इंडियाचे नेतृत्व

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. तर आफ्रिकन संघाचे नेतृत्व एडेन मार्कराम करणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना 9 डिसेंबरला कटकच्या बाराबती मैदानावर खेळवला जाईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील. नाणेफेक अर्धा तास आधी होईल.

हेही वाचा – India vs South Africa 3rd ODI : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली

टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

पहिला टी-20 : 9 डिसेंबर – कटक
दुसरा टी-20 : 11 डिसेंबर – न्यू चंदीगड
तिसरा टी-20 : 14 डिसेंबर – धर्मशाला
चौथा टी-20 : 17 डिसेंबर – लखनौ
पाचवा टी-20 : 19 डिसेंबर – अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)

भारतीय संघ  

सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे यांसारखे दमदार फलंदाज संघात आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आघाडीवर असून त्याला हर्षित राणा आणि अर्शदीप सिंगची साथ मिळणार आहे. फिरकी विभागात कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

हेही वाचा – Year in Search 2025: 14 वर्षांच्या या क्रिकेटपटूची धडाकेबाज कामगिरी; विराट कोहली आणि धोनीलाही मागे टाकत गुगल सर्चमध्ये ठरला अव्वल

दक्षिण आफ्रिका संघ 
एडेन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हिस, क्विंटन डी कॉक, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जानसेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी, अँरिच नॉर्टजे, लुथो सिपामला, ट्रिस्टन स्टब्स.

भारताच्या तरुण आणि अनुभवी खेळाडूंच्या मिश्रणाला दक्षिण आफ्रिकेची तगडी स्पर्धा मिळणार आहे. मालिकेची सुरुवात कटकमध्ये होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version