India Won Asia Cup 2025 : युद्धाच्या मैदानातच नव्हे तर खेळाच्या मैदानातही भारताने पाकिस्तानला नमवलं! 9 व्यांदा जिंकला आशिया कप

147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 2 चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवले. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा तिलक वर्मा याचा होता.
India Won Asia Cup 2025 : युद्धाच्या मैदानातच नव्हे तर खेळाच्या मैदानातही भारताने पाकिस्तानला नमवलं! 9 व्यांदा जिंकला आशिया कप

India Won Asia Cup 2025: भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवून नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 2 चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवले. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा तिलक वर्मा याचा होता, ज्यांनी 69 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. गोलंदाजीत कुलदीप यादव ने 4 विकेट्स घेत भारतीय संघाला मजबूत पकड दिली.

पाकिस्तानने सलामी भागीदारीत साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी 84 धावांची भागीदारी केली. फरहानने 57 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. फरहान बाद होताच, इतर पाकिस्तानी फलंदाजांनी आपले विकेट्स गमावले आणि शेवटच्या 62 धावांत सर्व 10 विकेट्स गमावल्या. टीम इंडियाच्या काही स्टार फलंदाजांनी या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. अभिषेक शर्मा फक्त 5 धावा, शुभमन गिल 12 धावा करून बाद झाले. कर्णधार सूर्यकुमार यादव फक्त 1 धावावर बाद झाला, आणि संपूर्ण स्पर्धेत त्याने फक्त 72 धावा केल्या.

हेही वाचा – IND vs PAK Final: तिलक वर्माचं अर्धशतक! टीम इंडियाची विजयाच्या दिशेने वाटचाल

तिलक वर्मा बनला विजयाचा नायक

या वेळी तिलक वर्मा तारणहार म्हणून समोर आले. त्याने नाबाद 65 धावा केल्या, तर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांच्यातील 57 धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. सॅमसनने 21 चेंडूत 24 धावा करून संघाला मजबूती दिली. 

हेही वाचा – India Vs Pakistan Asia Cup 2025 Final : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यापूर्वी दोन कर्णधारांसाठी वेगवेगळे प्रेझेंटर कोण? जाणून घ्या

भारताने  9 वेळा जिंकला आशिया कप – 

दरम्यान भारताने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला असून, या विजयाने संघाला नवव्यांदा विजेता मिळण्याचा मान मिळाला आहे. भारताने फक्त 10 धावांवर दुसरी विकेट गमावली तेव्हा तिलक फलंदाजीस आले आणि संयमाने 67 धावांची सामना जिंकणारी खेळी केली. भारतानंतर श्रीलंकेने 6 वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे. 2025 च्या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानवर पराभवाची हॅटट्रिक साधली. ग्रुप स्टेजमध्ये भारताने 7 विकेट्सने, सुपर 4 फेरीत 6 विकेट्सने विजय मिळवला, आणि आता अंतिम सामन्यातही पाकिस्तानला हरवत विजयाची हॅटट्रिक साधली. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version