IND vs PAK Live Streaming: आशिया कप 2025 च्या महाअंतिम फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. आशियातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमी या लढतीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
टीम इंडियाने स्पर्धेत अपराजित कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. तर पाकिस्ताननेही दमदार खेळ करत फायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारत-पाक अंतिम फेरीत भिडणार असून हा सामना नाट्य, थरार आणि रोमांच याने भरलेला असेल.
सामना कधी सुरू होणार?
हा महत्त्वाचा सामना रविवार, 28 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता सुरू होईल. टॉस संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.
LIVE प्रक्षेपण कुठे पाहता येणार?
भारतातील प्रेक्षकांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर हा सामना थेट पाहता येईल. मोबाईल आणि लॅपटॉपवरही सामना पाहता येणार असून यासाठी Sony LIV अॅप आणि वेबसाइटवर LIVE स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
संघ रचना (India vs Pakistan):
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
पाकिस्तान: सलमान अली आगा (कर्णधार), फखर जमान, अबरार अहमद, फहीम अशरफ, हरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, सलमान मिर्झा, सुफयान मोकीम.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.