India-W vs Pakistan-W : भारत-पाकिस्तान महिला सामना रद्द होणार का? जाणून घ्या, काय आहे कारण

महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात झाले असले तरी, पाकिस्तानविरुद्धचा हा सामना कोलंबोत खेळवला जात आहे. स्पर्धेत पहिल्या सामन्यात भारतीय संघाने गुवाहाटी येथे श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला होता.
India-W vs Pakistan-W : भारत-पाकिस्तान महिला सामना रद्द होणार का? जाणून घ्या, काय आहे कारण

नवी दिल्ली : आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. हा महत्त्वाचा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असतानाच, या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे हवामान अंदाजात स्पष्ट झाले आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस हजेरी लावणार?
हा सामना कोलंबोमध्ये होणार असून, हवामान अंदाजानुसार सामन्यादरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अॅक्युवेदरच्या वृत्तानुसार, सामन्याची वेळ सुरू होण्यापूर्वी सकाळच्या वेळी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी 3 वाजता सामना सुरू होण्याच्या वेळेस कोलंबोमध्ये 99 टक्के ढगाळ वातावरण असेल आणि दुपारी 12 नंतर पाऊस पडण्याची शक्यता 50 टक्के इतकी असणार आहे.
ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शक्यतेमुळे सामन्यात व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही संघांचे खेळाडू या सामन्यातही हस्तांदोलन करणे टाळतील, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – IND vs PAK : भारतीय महिला संघ 5 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत भिडणार; BCCI ने दिला 'हा' खास आदेश

भारताचा 100% विक्रमासह दुसऱ्या विजयाचा प्रयत्न
महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात झाले असले तरी, पाकिस्तानविरुद्धचा हा सामना कोलंबोमध्ये खेळवला जात आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने गुवाहाटी येथे श्रीलंकेवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता आणि विजयी सलामी दिली होती. पाकिस्तानविरुद्ध होणारा हा भारतीय संघाचा दुसरा सामना असणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ सलग दुसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.

हेड टू हेड रेकॉर्ड: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड 100 टक्के विजयाचा राहिला आहे. दोन्ही संघ 11 वेळेस आमनेसामने आले असून, भारतीय संघाने सर्वच्या सर्व 11 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यातही एकतर्फी विजयाची नोंद करू शकतो. गुणतालिकेत भारतीय संघ 2 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

हेही वाचा – Indian T20 Team: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय टी-20 संघ जाहीर; दुखापतीमुळे हार्दिक पंड्या बाहेर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version