Hardik Pandya Century : 6, 6, 6, 6, 6, 4… हार्दिक पांड्याने 6 चेंडूत 34 धावा काढत इतिहास रचला; पाहा वादळी खेळीचा व्हिडिओ

राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर विदर्भाविरुद्ध खेळताना हार्दिकने गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला. एकाच षटकात 5 षटकार आणि 1 चौकार खेचत त्याने अवघ्या 68 चेंडूत आपले पहिले लिस्ट 'A' शतक पूर्ण केले.<br/>
Hardik Pandya Century : 6, 6, 6, 6, 6, 4… हार्दिक पांड्याने 6 चेंडूत 34 धावा काढत इतिहास रचला; पाहा वादळी खेळीचा व्हिडिओ

Hardik Pandya Century : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटचा जलवा दाखवत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर विदर्भाविरुद्ध खेळताना हार्दिकने गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला. एकाच षटकात 5 षटकार आणि 1 चौकार खेचत त्याने अवघ्या 68 चेंडूत आपले पहिले लिस्ट ‘A’ शतक पूर्ण केले.

6 चेंडूत 34 धावा; मैदानावर पांड्याचं ‘चक्रीवादळ’

सुरुवातीला शांत खेळणाऱ्या हार्दिकने 50 धावा पूर्ण केल्यानंतर आपला आक्रमक पवित्रा स्वीकारला. 38 व्या षटकापर्यंत 66 धावांवर खेळणाऱ्या हार्दिकने 39 व्या षटकात रुद्र अवतार धारण केला. त्याने सलग 5 षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत एकाच षटकात 34 धावा वसूल केल्या. या वादळी खेळीत त्याने एकूण 8 षटकार आणि 6 चौकारांची आतषबाजी केली.

हेही वाचा – ICC Player Ranking : टीम इंडियाचा तिन्ही फॉरमॅटमध्ये दरारा; जसप्रीत बुमराह आणि जडेजाने गाजवलं मैदान

कारकिर्दीतील पहिले लिस्ट ‘A’ शतक

119 सामने आणि 13 अर्धशतकांनंतर हार्दिकला अखेर लिस्ट ‘A’ क्रिकेटमध्ये शतकाचा टप्पा ओलांडता आला. बडोद्याचे इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत असताना हार्दिकने 143 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत संघाला सावरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T-20 मालिकेनंतर थेट 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये उतरलेल्या हार्दिकने आपली फिटनेस आणि फॉर्म सिद्ध केला आहे.

हेही वाचा – Rohit Sharma & Virat Kohli : रोहित आणि विराट अडचणीत! नवीन वर्षात बीसीसीआय नेमकं काय करणार?

न्यूझीलंड मालिकेत विश्रांतीची शक्यता

हार्दिकने ही खेळी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेच्या संघ निवडीपूर्वी केली असली तरी, त्याला या मालिकेत विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. 2026 च्या T-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी संघ व्यवस्थापन त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती देऊ शकते.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version