राज्यात तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह

महाडमध्ये शिवज्योतींचे उत्साहात स्वागत संपुर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी महाडमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. रायगड, नवीमुंबई, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील अनेक शिवप्रेमी मंडळ किल्ले रायगडावरून शिवज्योत घेऊन जातात. महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून आणि श्री […]

राज्यात तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह

महाडमध्ये शिवज्योतींचे उत्साहात स्वागत

संपुर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी महाडमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. रायगड, नवीमुंबई, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील अनेक शिवप्रेमी मंडळ किल्ले रायगडावरून शिवज्योत घेऊन जातात. महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे, स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या माध्यमातून नाते खिंड येथे या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. वाहनांवर लावलेले भगवे झेंडे, ढोल ताशांचा ठेका, शिवाजी महाराजांचा जयघोष आणि शिव चरित्रावर आधारीत पोवाड्यांचे सुर याने महाडमधील वातावरण शिवमय झाले आहे.

नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांना पंचामृताने अभिषेक

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने नागपुरातील महाल परिसरात शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शिवभक्त मोठ्या उत्साहाने त्यात सहभागी झाले आहेत. यावेळी पहाटे शिवाजी महाराजांना पंचामृताने अभिषेक करण्यात आला. दिवस भर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

बुलडाण्यात मनसेकडून शिवजन्मोत्सव

आज तिथीनुसार शिव जयंती असल्याने बुलडाणा या मा जिजाऊंच्या जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सकाळपासूनच शिवजन्मोत्सव सुरू करण्यात आला आहे. सकाळीच मनसेचे विठ्ठल लोखंडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खामगाव येथील वि अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करून शिवजन्मोत्सवाला सुरुवात केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर बुलडाण्यात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number