दुलीप ट्रॉफी 2026 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये ईस्ट झोन संघाने सेंट्रल झोन संघाचा पराभव केला. मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या 'सेंट्रल झोन'चा चार गडी राखत ईशान किशनच्या नेतृत्वाखाली ईस्ट झोन'ने संयमी विजय मिळवला. पहिल्या डावात फलंदाजी करताना सेंट्रल झोनने 266 धावा केल्या आणि ईस्ट झोननेही 266 धावा करत डाव बरोबरीस आणला.
हेही वाचा- IND vs AFG T20: भारत-अफगाणिस्तान T20 मालिकेची घोषणा; वैभव सूर्यवंशीला मिळाली मोठी संधी
दुसऱ्या डावात ईस्ट झोनने सेंट्रल झोनचा डाव 158 धावांवर संपवत समोर विजयासाठी 159 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीने पहिल्या डावात 92 धावांची धडाकेबाज खेळी केली. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने दोन्ही डावात मिळून सात विकेट आपल्या नावावर करत सामनावीर पदवीवर आपले नाव कोरले.
ईशान किशनसाठी कर्णधार म्हणून हा विजय विशेष महत्त्वाचा ठरला आहे. कारण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 15 सामन्यांत नेतृत्व केलं असून, त्यापैकी 8 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे, तर 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. ईशानच्या नेतृत्वाखालील संघाला आतापर्यंत एकाही सामन्यात पराभव पत्करावा लागलेला नाही.