Dussera 2025 : हिंदू धर्मात विजयादशमी (दसरा) या सणाला विशेष महत्त्व आहे, कारण हा सण वाईटावर चांगल्याचा, अन्यायावर न्यायाच्या आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला हा सण साजरा होतो. यंदाचा दसरा पारंपरिक रावण दहनाच्या सोहळ्यासोबतच, ज्योतिषशास्त्रानुसारही अत्यंत शुभ मानला जात आहे.
दुर्मीळ ग्रह योगाचा संयोग
यावर्षी दसऱ्याला ग्रह-नक्षत्रांचे खास शुभ योग जुळून येत आहेत. ज्योतिषांच्या मते, या वेळी रवि योग, सुकर्मा योग आणि धृति योग असे तीन शुभ योग एकत्र जुळून येणार आहेत. याशिवाय, दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी बुध आणि मंगळ यांची युती होणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या विशेष बदलांमुळे काही राशींच्या जातकांना करिअर, नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात मोठे सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे.
या 3 राशींना लॉटरी लागणार
1. मेष राशी
मेष राशीसाठी यंदाचा दसरा अत्यंत फलदायी ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील. बराच काळ प्रलंबित राहिलेली कामे या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीला योग्य यश मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण निर्माण होईल, तसेच सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
हेही वाचा – Ravan Dahan At Home 2025: दसऱ्याला घरात रावण दहन करावे की नाही? यामुळे काही दोष लागतो का? चला, जाणून घेऊ..
2. कर्क राशी
कर्क राशीच्या जातकांसाठी विजयादशमीचा दिवस उत्तम संधी घेऊन येत आहे. करिअरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील आणि कामात मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल आणि नोकरीत प्रमोशनची दाट शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम मानला जात आहे. कौटुंबिक जीवनातही समाधान आणि सौहार्द अनुभवायला मिळेल.
3. धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी दसरा भाग्यवर्धक ठरेल. करिअरमध्ये स्थैर्य येईल आणि प्रगतीची नवी दारे खुली होतील. बराच काळ अडकलेली कामे पूर्ण होऊन तुम्हाला दिलासा मिळेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील आणि त्या तुम्ही यशस्वीरीत्या पार पाडू शकाल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील आणि वैवाहिक नात्यात अधिक जवळीक व मजबुती येईल.
हेही वाचा – Dussehra 2025 : दसऱ्याला करा धनप्राप्तीचे 'हे' उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न आणि होईल सोन्याची लयलूट!
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.