‘क्रिकेटचा देव’ खरा आहे तरी कसा?

तो आला, तो खेळला, त्याने स्टेडिअम जिंकलं आणि जगाची मनही जिंकली. असा एक क्रिकेट खेळाडू ज्याने जगाला क्रिकेटमध्ये ‘देव‘ बघायला शिकवले. या देवाचा म्हणजेच आपल्या सचिन तेंडुलकर याचा आज 24 एप्रिल 1973 जन्मदिवस. या खेळाकडे, क्रिकेटकडे श्रद्धा, आस्थेने पहायला भाग पाडलं, ते सचिनच्या खेळण्याच्या अनोख्या शैलीमुळे. मराठी साहित्यिक रमेश तेंडुलकर यांना दुसऱ्या पत्नीकडून झालेला मुलगा […]

‘क्रिकेटचा देव’ खरा आहे तरी कसा?

तो आला, तो खेळला, त्याने स्टेडिअम जिंकलं आणि जगाची मनही जिंकली. असा एक क्रिकेट खेळाडू ज्याने जगाला क्रिकेटमध्ये ‘देव‘ बघायला शिकवले. या देवाचा म्हणजेच आपल्या सचिन तेंडुलकर याचा आज 24 एप्रिल 1973 जन्मदिवस. या खेळाकडे, क्रिकेटकडे श्रद्धा, आस्थेने पहायला भाग पाडलं, ते सचिनच्या खेळण्याच्या अनोख्या शैलीमुळे. मराठी साहित्यिक रमेश तेंडुलकर यांना दुसऱ्या पत्नीकडून झालेला मुलगा सचिन. आपल्या सचिन देव बर्मन (S.D.) यांच्या संगीतावरील प्रेमापोटी वडील रमेश यांनी त्यांच्या मुलाचेही नाव सचिन ठेवले. याचनिमित्ताने सचिनविषयी काही न माहिती गोष्टी पाहुयात:

मैदानामधला ‘तो’ खरा आहे तरी कसा?

वय अवघं १५ वर्षे. मुंबई विरूद्ध गुजरातच्या सामन्यामध्ये शतक झळकवणारा सर्वात तरूण खेळाडू.

रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावणारा सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे.

तेंडुलकरच्या नावे एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे.  आत्तापर्यंत १९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३ अशा सहा वेळा त्याने हा पराक्रम केलेला आहे. १९९८ साली त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही.

वयाच्या चौदाव्या वर्षी तो 1987 च्या वर्ल्डकप दरम्यान इंडिया आणि झिम्ब्वॉब्वे सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडिअमवर ‘बॉल बॉय’ म्हणून होता.

१०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,०००, १५,०००, १६,०००, १७,०००, १८,००० धावांचे लक्ष्य प्रथम आणि सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज.

‘अपनालय’ नामक मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत दरवर्षी २०० गरजू मुलांना आर्थिक अथवा इतर मदत करतो.

सचिनचं फेरारीवरचं प्रेम जगजाहीर आहे. त्याच्याकडे ‘फेरारी ३६० मॉडेना’ आहे. सचिन रस्त्यावरून या फेरारीसोबत बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. पण हीच फेरारी त्याला डोकेदुखी ठरली होती. कस्टमकडून ह्या गाडीच्या करावर सूट दिली होती.त्यामुळे ह्या फेरारीची सवारी प्रकरण सचिनसाठी डोकेदुखी ठरली होती. शेवटी फियाटने कर भरून हे प्रकरण मिटवले होते.

सचिन तेंडुलकर याची २०१२ मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाली. २१ डिसेंबर २०१७ या दिवशी सचिन संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत पहिलंवहिलं भाषण करणार होता, पण त्याकाळी पतंप्रधान असणाऱ्या मनमोहन सिंग यांच्यावर नरेंद्र मोदी यांच्याकडून वादग्रस्त विधानाच्या विरोधात संसदेमध्ये गदारोळ माजला होता, त्यामध्ये सचिनला त्याचे भाषण करता आले नव्हते, पण त्यानंतर सचिनने फेसबुकवरून त्याचे पहिलं भाषण व्हिडीओमधून सादर केले होते.

तेंडुलकरने १४ नोव्हेंबर २०१३ रोजी आपला २००वा कसोटी सामना खेळून झाल्यावर क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.

सचिनला परफ्युम्स आणि घड्याळ्यांची फार आवड आहे. त्याच्याकडे यांचे बरेच कलेक्शन्स आहेत.

Advertise विश्वामध्ये सचिनने Boost Drink ची पहिली जाहिरात केली होती.

सचिन हा Crease वर जास्त वजनाची बॅट वापरायचा, त्याची बॅट जवळजवळ 3.2 lbs वजनाची असायची.

सचिन लहानपणापासूनच खोडकर स्वभावाचा होता. शाळेच्या Vacation मध्ये तो एकदा झाडावरून पडला होता.

त्यावेळस सचिनच्या भावाने त्याला punishment म्हणून Cricket Coaching Class ला पाठवले होते.

सचिनची एक गोष्ट कुणालाच माहित नाहीये की, सचिन सौरव गांगुलीला ’बाबु मोशाय’ म्हणून बोलावतो तर सौरव सचिनला ‘छोटा बाबू’.

सचिन तेंडुलकरचे काही न पाहिलेले छायाचित्र:

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number