खेडशिवापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील खेडशिवापूर टोलनाका बाहेर हटविण्यासाठी ‘शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती’कडून आज 16 फेब्रुवारी रोजी खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर वाहतुकीचा प्रश्न अथवा कोंडी निर्माण होवू नये, याकरीता साताराकडून पुणे बाजुकडे जाणारी वाहने दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुढील मार्गाने वळवण्यात आली आहेत.
सातारा वाढे फाटा-वाठार स्टेशन-फलटण-लोणंद मार्गे पुणे,
जोशी विहिर वाठार मार्गे लोणंद-निरा-जेजुरी मार्गे पुणे,
खंडाळा-लोणंद मार्गे पुणे,
शिरवळ-लोणंद मार्गे-निरा-जेजुरी मार्गे पुणे,
वाई-शहाबाग फाटा-ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार,
वाई-एमआयडीसी फाटा मार्गे शहाबाग फाटा- ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार,
अवजड वाहनं वाढे फाटा मार्गे वाठार-लोणंद मार्गे पुण्याकडे जातील.
16 फेब्रुवारी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांचा मार्ग पुढीलप्रमाणे –
सातारा वाढेफाटा- वाठार स्टेशन-लोणंद मार्गे निरा, जेजुरी मार्गे पुणे
शिरवळ- लोणंद मार्गे- निरा, जेजुरी मार्गे पुणे
वाई – शहाबाग फाटा – ओझर्डे – जोशी विहीर मार्गे – वाठार स्टेशन मार्गे पुणे
अवजड वाहने वाढे फाटा मार्गे- वाठार स्टेशन- लोणंद मार्गे पुण्याकडे जातील