ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर असून बीसीसीयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. कसोटी आणि वनडे मालिकसाठी जाहीर केलेल्या संघामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारतीय संघात हार्दिक पंड्याचे कमबॅक झाले आहे. मात्र त्याची प्रकृती ठीक असल्यास तो मैदानात उतरणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघामधील मालिकेला 22 सप्टेंबपासून सुरूवात होणार आहे. चार दिवसीय पहिला कसोटी सामना 22-26 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. तर दुसरा कसोटी सामना सप्टेंबर 29 ते 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर तीन वनडे सामने 6 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबरला होणार आहे. या दोन्ही फॉरमॅटसाठी बीसीसीआयने दोन वेगळ्या संघांची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलिया-A आणि भारत-A यांच्यातील मालिकेसाठी BCCI ने संघ जाहीर केला आहे. या मालिकेत 2 मल्टी-डे सामने आणि 3 वनडे सामने असतील. सर्व सामने पाँडिचेरी येथे खेळवले जातील.
संघ:
BCCI ने दोन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे संघ तयार केले आहेत. यात युवा खेळाडूंना संधी दिली आहे
मल्टी-डे संघाचा कर्णधार:देवदत्त पडिक्कल (उपकर्णधार – साई सुदर्शन)
वनडे संघाचा कर्णधार: ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार – देवदत्त पडिक्कल)
या चार दिवसांच्या सामन्यांसाठी जाहीर झालेल्या संघात मुंबई रणजी संघातील शम्स मुलानी, तनुष कोटियन यांच्याकडे स्पिन तर तुषार देशपांडे, प्रफुल हिंगे मुंबई रणजी संघातील शम्स मुलानी, तनुष कोटियन यांच्याकडे स्पिन तर तुषार देशपांडे, अंशुल कंबोज, प्रफुल्ल हिंगे, नचिकेत भुते आणि व्ही. वैशाक यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.