ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेत 1 गडी गमवून सहज ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता ही मालिका ऑस्ट्रेलियाच्या हातून गेली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 198 धावांवर बाद होत बांगलादेशला विजयासाठी अवघ्या 56 धावांचं आव्हान दिलं होतं.
बांगलादेशने पहिल्या डावात 228 धावांची मजबूत आघाडी घेत हे आवाहन 426 धावांसह पूर्ण केलं. दरम्यान ऑस्ट्रेलियाने दिलेलं आवाहन पूर्ण करण्यात हसन महमुद याने महत्त्वाची भूमिका बजावली. हसन महमुदने 6 विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला 198 धावांवर रोखलं. तर दुसरीकडे बांगलादेशकडून तन्झिद हसन तमीमचं शतक, नजमुल होसेने शांतोच्या 84 धावा आणि मेहिदी हसनच्या 65 धावांमुळे बांगलादेशी संघ मजबूत स्थितीत आला.
त्यानंतर हसन महमुद पुन्हा दुसऱ्या डाव्यात 3 विकेट काढून बांगलादेशच्या विजयाचा मुख्य हिरो ठरला. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मोठा इतिहास रचला आहे. या सामन्यात पूर्णपणे बांग्लादेश संघाची पकड दिसून आली. कांगारूंना कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. पहिल्या डावापासून बांगलादेशी संघ वरचढ राहिला. त्याचा परिणाम या सामन्यात विजयाने झाला. दरम्यान बांगलादेशने टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलं आहे.