Asia Cup 2025 Points Table: पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर सुपर-4 मध्ये भारत अव्वल; पहा आगामी सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

भारताने 21 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला, ज्यामुळे टीम इंडियाने पॉइंट टेबलवर अव्वल स्थान मिळवले.
Asia Cup 2025 Points Table: पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर सुपर-4 मध्ये भारत अव्वल; पहा आगामी सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Asia Cup 2025 Points Table: आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडियाने आठवड्यात दुसऱ्यांदा पाकिस्तानला हरवून आपली पकड सुपर फोर टप्प्यात अधिक मजबूत केली आहे. भारताने 21 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला, ज्यामुळे टीम इंडियाने पॉइंट टेबलवर अव्वल स्थान मिळवले.

भारताचा पुढील सामना

भारताचा पुढील सामना 24 सप्टेंबर रोजी दुबईत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 26 सप्टेंबरला श्रीलंकेशी सामना आहे, जो अंतिम पात्रतेसाठी निर्णायक ठरू शकतो.

पाकिस्तानची कामगिरी

रविवारी पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी श्रीलंकेवर 23 सप्टेंबरला 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तान पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, परंतु त्यांचे स्थान अजून डळमळीत आहे कारण त्यांनी सुपर फोरमध्ये 2 सामने खेळले आहेत. भारत, बांगलादेश आणि श्रीलंका प्रत्येकी 1 सामना खेळले आहेत.

हेही वाचा – USA Cricket Board: यूएसए क्रिकेटवर ICC चा डाव; बोर्ड निलंबित, संघाचे भविष्य काय?

पॉइंट टेबल आणि नेट रन रेट

सुपर फोरमध्ये भारत अव्वल स्थानावर असून, त्यांचा नेट रन रेट +0.689 आहे. पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर असून त्यांचा नेट रन रेट +0.226 आहे.

आशिया कप 2025: सुपर फोर सामन्यांचे वेळापत्रक आणि निकाल 

20 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – बांगलादेश 4 विकेट्सने विजयी
21 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध भारत – भारत 6 विकेट्सने विजयी
23 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – पाकिस्तान 5 विकेट्सने विजयी
24 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध भारत – दुबई
25 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान – दुबई
26 सप्टेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका – दुबई
28 सप्टेंबर: अंतिम सामना – दुबई

हेही वाचा – Asia Cup 2025: पाकिस्तानला श्रीलंकेसोबतच्या सामन्यानंतर गाशा गुंडाळावा लागणार? आकडेवारी सांगते संघाची खरी स्थिती

भारत आणि बांगलादेश: संभाव्य संघ

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग

बांगलादेश: लिटन दास (कर्णधार), तन्झिद हसन, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद हृदोय, जाकेर अली अनिक, शमीम हुसेन, नुरुल हसन सोहन, महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, सैफ उद्दीन.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version