Mohsin Naqvi Trophy Controversy : ‘ट्रॉफी चोरी’ची तक्रार करण्याच्या इशाऱ्याने नक्वी वठणीवर; पण बैठकीत काय-काय घडलं?

अनेक रिपोर्टमध्ये खुलासा झाल्याप्रमाणे, बैठकीमध्ये मोहसीन नक्वी यांनी म्हटले की, &quotजे घडले ते चुकीचे आहे. आपण...'
Mohsin Naqvi Trophy Controversy : ‘ट्रॉफी चोरी’ची तक्रार करण्याच्या इशाऱ्याने नक्वी वठणीवर; पण बैठकीत काय-काय घडलं?

Mohsin Naqvi Trophy Controversy : आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून टीम इंडियाने दिमाखात विजेतेपद पटकावले; पण त्यानंतर ट्रॉफी देण्यावरून मोठा वाद सुरू झाला होता. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी आणि वैयक्तिक मेडल्स स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. या नकारावर चिडलेल्या नक्वी यांनी चक्क भारताची ट्रॉफी आणि खेळाडूंची मेडल्स आपल्या ताब्यात घेऊन हॉटेल गाठले. यानंतर नक्वी यांच्यावर भारत आणि BCCI कडून आशिया चषक आणि मेडल्स 'चोरून' हॉटेलमध्ये घेऊन गेल्याचा आरोप झाला, ज्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला.

बीसीसीआयचा संताप आणि पोलिसांत तक्रारीचा इशारा
आशिया कप जिंकून अनेक तास उलटून गेल्यानंतरही भारताला अद्याप हक्काची ट्रॉफी मिळाली नाही. मोहसीन नक्वी यांच्या या कृतीनंतर बीसीसीआयने (BCCI) चांगलाच संताप व्यक्त केला. बीसीसीआयने केवळ संताप व्यक्त केला नाही, तर थेट दुबई पोलिसांमध्ये ट्रॉफी चोरीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. बीसीसीआयने नक्वी यांना 72 तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, आता या सर्व घडामोडींनंतर एसीसीने (Asian Cricket Council) ही ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केली असून, लवकरच ती बीसीसीआयकडे (BCCI) हस्तांतरित केली जाणार आहे.

नक्वी यांची रडारड
नक्वी यांनी आपल्याकडून भारतीय संघ ट्रॉफी आणि मेडल्स स्वीकारू इच्छित नाही, हे आपल्याला लिखित स्वरूपात कळवले गेले नव्हते, असा कांगावा नक्वी यांनी केला. तसेच, 'मी ट्रॉफी आणि मेडल्स देण्यासाठी कार्टूनसारखा स्टेजवर उभा होतो,' असेही नक्वी म्हणाले. मात्र, पाकिस्तान आणि नक्वी यांच्या या रडीच्या डावाचा काही उपयोग झाला नाही. भारत आणि बीसीसीआयने कडक भूमिका घेत नक्वी यांच्या कृतीला चांगलेच फटकारले.

हेही वाचा – Asia Cup 2025 Trophy: भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय! अखेर मोहसिन नक्वी यांनी आशिया कप ट्रॉफी UAE क्रिकेट बोर्डाकडे सोपवली

दुबईतील बैठकीत माफीनामा
या सर्व नाट्यमय घडामोडींदरम्यान, दुबईत एशियन क्रिकेट कौन्सिलची बैठक झाली. या बैठकीमध्ये बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोहसीन नक्वी यांना ट्रॉफी प्रकरणावरून चांगलेच धारेवर धरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर सर्व सदस्य देश भारताच्या भूमिकेच्या बाजूने उभे दिसले. बीसीसीआयने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांना अखेर बीसीसीआयकडे माफी मागावी लागली.

मोहसीन नक्वींची थेट विनंती
अनेक रिपोर्टमध्ये खुलासा झाल्याप्रमाणे, बैठकीमध्ये मोहसीन नक्वी यांनी म्हटले की, "जे घडले ते चुकीचे आहे. आपण नव्याने सुरुवात करूया. मी माफी मागतो." एवढेच नव्हे तर, त्यांनी पुढे विनंती करत म्हटले की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने येऊन आशिया चषक घेऊन जावा. आता नक्वींनी माफी मागितल्यानंतर आणि ट्रॉफी देण्याची तयारी दर्शवल्यानंतर बीसीसीआय यावर नेमकी काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – Mohsin Naqvi : आशिया कप ट्रॉफी वादाप्रकरणी मोहसिन नक्वीला 72 तासांचा अल्टिमेटम; अन्यथा खावी लागेल जेलची हवा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version