WPL 2026 : RCB ला मोठा धक्का ! एलिस पेरी आणि ॲनाबेल सदरलँडची स्पर्धेतून माघार, ‘या’ भारतीय खेळाडूला मिळाली संधी

ऑस्ट्रेलियाच्या दोन दिग्गज खेळाडू एलिस पेरी आणि ॲनाबेल सदरलँड यांनी वैयक्तिक कारणास्तव या आगामी हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
WPL 2026 : RCB ला मोठा धक्का ! एलिस पेरी आणि ॲनाबेल सदरलँडची स्पर्धेतून माघार, ‘या’ भारतीय खेळाडूला मिळाली संधी

WPL 2026 : महिला प्रीमियर लीग (WPL 2026) चा हंगाम सुरू होण्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन दिग्गज खेळाडू एलिस पेरी आणि ॲनाबेल सदरलँड यांनी वैयक्तिक कारणास्तव या आगामी हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन्ही संघांच्या रणनीतीला मोठा फटका बसला आहे.

पेरीच्या जागी सायली सतघरे, तर सदरलँडच्या जागी अलाना किंग

एलिस पेरीच्या अनुपस्थितीत RCB ने सायली सतघरेला 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीवर संघात सामील केले आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने सदरलँडच्या जागी अनुभवी ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर अलाना किंगला 60 लाख रुपयांना करारबद्ध केले आहे. किंगने 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 27 बळी घेतले असून, तिच्या अनुभवाचा दिल्लीला फायदा होणार आहे.

आरसीबीसाठी पेरीची उणीव भरून काढणे कठीण

एलिस पेरी RCB च्या यशाचा मुख्य आधारस्तंभ राहिली आहे. 2024 मध्ये पेरीने 69.40 च्या सरासरीने 347 धावा करून 'ऑरेंज कॅप' जिंकली होती आणि 9 सामन्यांत 7 बळी घेत आरसीबीला विजेतेपद मिळवून दिले होते. 2025 च्या हंगामातही तिने 8 सामन्यांत 4 अर्धशतकांसह 372 धावा केल्या होत्या. या हंगामासाठी आरसीबीने तिला 2 कोटी रुपयांना कायम (Retain) ठेवले होते.

हेही वाचा – Suryakumar Yadav : "कित्येक क्रिकेटर्स माझ्या मागे, सूर्यकुमार यादव तर…" बोल्ड अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे सूर्याकुमार यादव पुन्हा चर्चेत

सदरलँड आणि दिल्ली कॅपिटल्स

ॲनाबेल सदरलँडने गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तिने 7.57 च्या इकॉनॉमी रेटने 9 बळी घेतले होते. दिल्लीने तिला 2.2 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेवर संघात कायम ठेवले होते.

हेही वाचा – MS Dhoni Video Viral : धोनीच्या गाडीत 'ते' पाकीट पाहून चाहते नाराज! सलमान खानच्या पार्टीला जातानाचा व्हिडीओ व्हायरल

यूपी वॉरियर्समध्येही बदल

युपी वॉरियर्सची खेळाडू तारा नॉरिस नेपाळमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी (18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी) उपलब्ध नसल्याने, वॉरियर्सने तिच्या जागी ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू चार्ली नॉटला 10 लाख रुपयांच्या मूळ किमतीवर करारबद्ध केले आहे. WPL 2026 चा थरार आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना 9 जानेवारी रोजी नवी मुंबईत मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात रंगणार आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version