नवी दिल्लीतील झोपडपट्टीला भीषण आग

७ मृत्यू, ६० झोपड्या जळून खाक नवी दिल्लीतील गोकलपुरी येथे झोपडपट्टीला भीषण आग लागली. शुक्रवारी लागलेल्या या आगीत सात जणांचा मृत्यू झाला असून ६० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. ही घटना घडताक्षणीच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू झाले. दिल्लीतील गोकलपुरी येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत सात […]

नवी दिल्लीतील झोपडपट्टीला भीषण आग

७ मृत्यू, ६० झोपड्या जळून खाक

नवी दिल्लीतील गोकलपुरी येथे झोपडपट्टीला भीषण आग लागली. शुक्रवारी लागलेल्या या आगीत सात जणांचा मृत्यू झाला असून ६० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. ही घटना घडताक्षणीच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू झाले.

दिल्लीतील गोकलपुरी येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली असल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाने दिली आहे. तसेच अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून सात मृतदेह बाहेर काढले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अतिरिक्त पोलिस उपायुक्त देवेश कुमार महला यांनी सांगितले की, आगीची माहिती पहाटे १च्या सुमारास मिळाली. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सर्व बचाव उपकरणांसह तात्काळ पथके घटनास्थळी पोहोचली. आम्ही अग्निशमन दलासोबत संपर्क साधला असून त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. आम्ही पहाटे ४ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणू शकलो’, असे दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी म्हणाले.

नवी दिल्लीमध्ये लागलेल्या आगीमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट केले की, सकाळीच ही दु:खद बातमी ऐकायला मिळाली. मी स्वत: दुर्घटनास्थळी जाऊन पीडितांची भेट घेणार असल्याचे त्यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.

………….

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number