उद्धव आणि शिंदे गटातील वादातून हवेत गोळीबार

शिवजयंतीच्या नियोजनासाठी देवळाली गावातील गणपती मंदिराजवळ सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती उत्सव समितीवर शिंदे गटात सहभागी झालेल्या लवटे गटाचे वर्चस्व आहे. यावेळी अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या चर्चेत ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला.अलीकडेच उद्धव गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक भैय्या मणियार आणि लवटे समर्थकांमध्ये संघर्ष उफाळून आल्याचे सांगितले जाते. दोन्ही गटाचे समर्थक […]

उद्धव आणि शिंदे गटातील वादातून हवेत गोळीबार

शिवजयंतीच्या नियोजनासाठी देवळाली गावातील गणपती मंदिराजवळ सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती उत्सव समितीवर शिंदे गटात सहभागी झालेल्या लवटे गटाचे वर्चस्व आहे. यावेळी अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या चर्चेत ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला.अलीकडेच उद्धव गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक भैय्या मणियार आणि लवटे समर्थकांमध्ये संघर्ष उफाळून आल्याचे सांगितले जाते. दोन्ही गटाचे समर्थक तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन परस्परांवर चालून गेले. यावेळी हवेत गोळीबार झाल्याचे सांगितले जाते. या घटनाक्रमाने परिसरात धावपळ उडाली. दुकाने बंद झाली.

दरम्यान पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या चालू आहे. उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा शिंदे गटाचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्निल लवटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटेंचा स्वप्नील लवटे हा पुतण्या देखिल आहे.

१९ फेब्रुवारीला शासकीय शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष निवड केली जाणार होती. याच दरम्यान हवेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक शहरातील पोलीस अधिकारी आणि पोलीस पथके देवळाली गावाकडे रवाना झाली होती. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये सुरुवातील राडा झाला होता, याच दरम्यान शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा मुलगा असलेल्या स्वप्नील लवटे याने राग आल्याने कमरेला लावलेली बंदूक काढून हवेत गोळीबार केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number