Pakistan vs Afghanistan : पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 3 अफगाण क्रिकेटपटूंसह 6 ठार; रशीद खान संतापला, तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय!

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खानने या &quotक्रूर&quot हवाई हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे युद्धविरामाचे उल्लंघन असल्याचे सांगत याला प्रत्युत्तर देणार असल्याचं अफगाणिस्तानने म्हटलं आहे.
Pakistan vs Afghanistan : पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 3 अफगाण क्रिकेटपटूंसह 6 ठार; रशीद खान संतापला, तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय!

Pakistan vs Afghanistan : दोन दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अखेर बुधवारी (15 ऑक्टोबर) तात्पुरता युद्धविराम झाला होता. मात्र, पाकिस्तानने हा युद्धविराम मोडला आहे. पाकिस्तानने शुक्रवारी (17 ऑक्टोबर) अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केले, ज्यात दोन लहान मुलांसह सहा नागरिकांचा मृत्यू झाला आणि 10 हून अधिक लोक जखमी झाले.

पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन स्थानिक क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने (ACB) मोठा निर्णय घेत पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत होणाऱ्या आगामी तिरंगी टी-20 मालिकेतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. एसीबीने सोशल मीडियावर एक पत्रक जारी करत या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खानने या “क्रूर” हवाई हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्याने एसीबीच्या माघार घेण्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. रशीद खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक नागरिकांचे मृत्यू झाल्याने मी खूप दुःखी आहे. या हल्ल्यात महिला, मुले आणि जागतिक स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे.”

हेही वाचा – Trump Tariff Bomb: ट्रम्प यांचा नवा टॅरिफ बॉम्ब! 25 टक्के कराची घोषणा; आता ‘या’ क्षेत्राला बसणार मोठा धक्का

रशीद खान पुढे म्हणाला, “निष्पाप जीव गमावल्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानविरुद्धच्या आगामी क्रिकेट सामन्यांमधून माघार घेण्याच्या एसीबीच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. या कठीण काळात मी आमच्या नागरिकांसोबत उभा आहे; आपली राष्ट्रीय प्रतिष्ठा महत्त्वाची आहे.” एसीबीने शनिवारी दिलेल्या निवेदनात, उरगुन जिल्ह्यातील कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून या तीन क्रिकेटपटूंसह इतर देशबांधव मृत्युमुखी पडले असून, सात जण जखमी झाल्याचे सांगितले.

अफगाणिस्तान संघ 5 ते 29 नोव्हेंबर दरम्यान लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेत सहभागी होणार होता. या मालिकेत पाकिस्तान आणि श्रीलंकेचाही समावेश होता. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर म्हटले आहे की, “आता युद्धविराम संपला आहे; पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल.”

दरम्यान, तणाव कमी करण्यासाठी आणि हिंसाचार रोखण्यासाठी दोहा येथे चर्चा सुरू होणार होती. अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ या चर्चेसाठी रवाना झाले आहे, तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर देखील दोहा येथे दाखल झाले आहेत. मात्र, युद्धविरामाची 48 तासांची मुदत पूर्ण होण्याआधीच पाकिस्तानने हवाई हल्ले केल्याने, दोहा येथील चर्चेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्याने पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांत हा संघर्ष सुरू झाला होता.

हेही वाचा – US Singer Mary Millben : ‘तुमच्या ‘I Hate India Tour’ वर परत जा’; अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version