मुंबई, ०४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारताचा महिला क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. २८ एप्रिल ते ०९ मे या कालावधीत ही मालिका खेळवली जाणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ २३ एप्रिलला बांगलादेशात पोहोचेल आणि १० मेला भारताकडे रवाना होईल. सर्व सामने सिल्हेट येथे खेळवले जाणार आहेत.
भारत वि. बांगलादेश सामन्यांचे वेळापत्रक
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.