Thursday, June 27, 2024 08:19:08 PM

भारत वि. बांगलादेश महिला टी-२० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

भारत वि बांगलादेश महिला टी-२० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, ०४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारताचा महिला क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. २८ एप्रिल ते ०९ मे या कालावधीत ही मालिका खेळवली जाणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ २३ एप्रिलला बांगलादेशात पोहोचेल आणि १० मेला भारताकडे रवाना होईल. सर्व सामने सिल्हेट येथे खेळवले जाणार आहेत.

भारत वि. बांगलादेश सामन्यांचे वेळापत्रक

  • २८ एप्रिल - पहिला सामना - सिल्हेट
  • ३० एप्रिल - दुसरा सामना - सिल्हेट
  • ०२ मे - तिसरा सामना - सिल्हेट
  • ०६ मे - चौथा सामना - सिल्हेट
  • ०९ मे - पाचवा सामना - सिल्हेट

सम्बन्धित सामग्री