विशाखापट्टणम, ०३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. शनिवारी (०३ फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस आहे. सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने आपले द्विशतक पूर्ण केले आहे. जैस्वालने २७७ चेंडूत चौकार मारून आपले द्विशतक पूर्ण केले. याआधी त्याने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले होते. कसोटीत द्विशतक करणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे.
यशस्वी जैस्वाल द्विशतक झळकावल्यानंतर काही वेळातच २०९ धावांवर जेम्स अँडरसनचा बळी ठरली. अँडरसनला षटकार मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. जॉनी बेयरस्टॉने त्याचा झेल टिपला. यशस्वी जैस्वालने २९० चेंडूत २०९ धावांची शानदार खेळी केली. त्याने १९ चौकार आणि ७ षटकार ठोकले.
कसोटीत द्विशतक करणारे युवा भारतीय –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.