Tuesday, July 02, 2024 08:16:31 AM

यशस्वी जैस्वालचं धमाकेदार द्विशतक

यशस्वी जैस्वालचं धमाकेदार द्विशतक

विशाखापट्टणम, ०३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. शनिवारी (०३ फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस आहे. सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने आपले द्विशतक पूर्ण केले आहे. जैस्वालने २७७ चेंडूत चौकार मारून आपले द्विशतक पूर्ण केले. याआधी त्याने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले होते. कसोटीत द्विशतक करणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे.

यशस्वी जैस्वाल द्विशतक झळकावल्यानंतर काही वेळातच २०९ धावांवर जेम्स अँडरसनचा बळी ठरली. अँडरसनला षटकार मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. जॉनी बेयरस्टॉने त्याचा झेल टिपला. यशस्वी जैस्वालने २९० चेंडूत २०९ धावांची शानदार खेळी केली. त्याने १९ चौकार आणि ७ षटकार ठोकले.

कसोटीत द्विशतक करणारे युवा भारतीय -

  • विनोद कांबळी- २२४ धावा वि. इंग्लंड १९९३ (२१ वर्षे ३५ दिवस)
  • विनोद कांबळी- २२७ धावा वि. झिम्बाब्वे, १९९३ (२१ वर्षे ५५ दिवस)
  • सुनील गावस्कर- २२० धावा वि.वेस्ट इंडिज १९७१ (२१ वर्षे २८३ दिवस)
  • यशस्वी जैस्वाल- २०९ वि. इंग्लंड २०२४ (२२ वर्षे ३७ दिवस)

सम्बन्धित सामग्री