Ravan Dahan At Home 2025: दसऱ्याला घरात रावण दहन करावे की नाही? यामुळे काही दोष लागतो का? चला, जाणून घेऊ..

हल्ली बाजारात मिळणारे रावणाचे छोटे पुतळे किंवा रावण कोरलेल्या कँडल (मेणबत्ती) उपलब्ध असतात. अशा वेळी अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो की, आपण हे पुतळे घरात जाळू शकतो का? चला, जाणून घेऊ..
Ravan Dahan At Home 2025: दसऱ्याला घरात रावण दहन करावे की नाही? यामुळे काही दोष लागतो का? चला, जाणून घेऊ..

Ravan Dahan 2025: आश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथीला, म्हणजेच 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमीचा (दसरा) उत्सव साजरा केला जाईल आणि याच दिवशी रावण दहन केले जाते. हा सण अधर्मावर धर्माच्या विजयाचे आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. अनेक वर्षांपासून रावण दहन मोठ्या सार्वजनिक ठिकाणी किंवा मैदानावर केले जाते, जेणेकरून मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन या परंपरेचे साक्षीदार होऊ शकतील.

घरात रावण दहन करणे योग्य आहे का?
हल्ली बाजारात मिळणारे रावणाचे छोटे पुतळे किंवा रावण कोरलेल्या कँडल (मेणबत्ती) उपलब्ध असतात. अशा वेळी अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो की, आपण हे पुतळे किंवा कँडल घरात जाळू शकतो का? यावर धार्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्तर जाणून घेऊया.
धार्मिक दृष्टिकोन : धार्मिक ग्रंथांमध्ये थेटपणे घरात रावण दहन करण्यास मनाई केलेली नाही. रावण दहन मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी करण्यामागे मुख्य कारण सुरक्षितता आणि जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणे हे असते. त्यामुळे घरात रावण दहन करणे अशुभ किंवा निषिद्ध मानले जात नाही, पण त्याचा उल्लेखही मिळत नाही.

दोष किंवा अपशकुन लागतो का?
घरात लहान रावण पुतळा किंवा प्रतीकात्मक वस्तू जाळल्यास कोणताही दोष लागत नाही किंवा अपशकुन होत नाही.
प्रतीकात्मक दहन: तुम्ही रावण दहन प्रतिकात्मक रूपाने म्हणजेच लहान पुतळा किंवा कॅंडल जाळून नक्कीच करू शकता.
सुरक्षितता महत्त्वाची: मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा पुतळा घरात जाळणे योग्य नाही, तसेच मोठे दहन करण्यासाठी काही विशिष्ट विधींची आवश्यकता असते, ज्यामुळे घरात मोठे दहन करणे टाळले जाते.

हेही वाचा  – Dussehra 2025 : दसऱ्याचं पूजन आणि रावण दहनासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या; धन-समृद्धीसाठीची असा करा योग्य पूजाविधी

रावण दहन केल्यावर काय करावे?
जर तुम्ही घरात रावणाचा छोटा पुतळा किंवा कॅंडल जाळत असाल, तर त्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
रावण दहन झाल्यावर घरात गंगाजल शिंपडावे. घरात दीप प्रज्वलित करून शुभ वातावरण निर्माण करावे. यामुळे कोणताही दोष लागत नाही.

रावण दहन शक्य नसल्यास काय करावे?
जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी रावण दहनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नसाल किंवा घरात प्रतिकात्मक दहन केले नसेल, तरीही तुम्ही हा दिवस अगदी शुभ पद्धतीने साजरा करू शकता.
घरात दीप प्रज्वलित करा. रामायणाचे किंवा हनुमान चालिसाचे पाठ करा. रावण दहन हे वाईट प्रवृत्तीच्या समाप्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही आपल्यातील वाईट गोष्टींचा त्याग करण्याचा संकल्प करूनही विजयादशमीचा उत्सव साजरा करू शकता.

हेही वाचा  – Dussehra 2025 : दसऱ्याला करा धनप्राप्तीचे 'हे' उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न आणि होईल सोन्याची लयलूट!

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version