‘मुख्यमंत्री कार्यलयातून आदेश आल्यावर रवी राणांवर कारवाई’ – नवनीत राणा

अमरावती पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकल्या प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता अमरावतीतील शिवबाच्या पुतळ्याचा वाद लोकसभेत पेटला आहे. याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत मविआवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश आल्यानंतर आमदार रवी राणा यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा […]

‘मुख्यमंत्री कार्यलयातून आदेश आल्यावर रवी राणांवर कारवाई’ – नवनीत राणा

अमरावती पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकल्या प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता अमरावतीतील शिवबाच्या पुतळ्याचा वाद लोकसभेत पेटला आहे. याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत मविआवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश आल्यानंतर आमदार रवी राणा यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

अमरावती पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, शाईफेक करतानाच्या वेळी रवी राणा हे अमरावतीत नव्हते. ते त्यावेळी विमानप्रवास करत होते. मात्र, त्यांच्यावर रात्री मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश आल्यानंतर ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केला आहे. तसेच ठाकरे सरकार विरोधात जे बोलणार त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, तर महाराष्ट्रात संविधानाची हत्या केली जात आहे, असा आरोपही खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केला आहे.

अमरावती येथील राजापेठ उड्डाणपूलावर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनान हटवल्यामुळे शिवप्रेमी नाराज झाले होते. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शिवप्रेमींनी अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकली आहे. तसेच याप्रकरणी काही शिवप्रेमी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number