Yogesh Kadam : ‘आमची बाजू योग्य, निकाल आमच्याच बाजूने लागेल’; शिवसेना पक्ष-चिन्हाबाबतच्या सुनावणीवर योगेश कदम यांनी व्यक्त केला विश्वास

रत्नागिरी : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रत्नागिरीत बोलताना योगेश कदम, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. शिवसेनेचे नाव, पक्षचिन्ह आणि बाळासाहेब ठाकरे यांची ओळख संपूर्ण जगाला माहिती आहे, असे म्हणाले. या नाव आणि चिन्हाशी असलेले नाते तोडण्याचे काम उद्धव बाळासाहेब […]

Yogesh Kadam : ‘आमची बाजू योग्य, निकाल आमच्याच बाजूने लागेल’; शिवसेना पक्ष-चिन्हाबाबतच्या सुनावणीवर योगेश कदम यांनी व्यक्त केला विश्वास

रत्नागिरी : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रत्नागिरीत बोलताना योगेश कदम, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. शिवसेनेचे नाव, पक्षचिन्ह आणि बाळासाहेब ठाकरे यांची ओळख संपूर्ण जगाला माहिती आहे, असे म्हणाले. या नाव आणि चिन्हाशी असलेले नाते तोडण्याचे काम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आमची बाजू योग्य आहे. त्यांची बाजू न्यायालयासमोर आली आहे. आमची बाजू समोर आल्यानंतर योग्य ते चित्र स्पष्ट होईल, असे योगेश कदम यांनी सांगितले. ज्या आधारावर शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले, त्याच आधारावर निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Gold-Silver Rate : सणासुदीच्या काळात चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक! चांदीच्या दरात 10 हजारांची उसळी, तर सोन्याचे दर 6 हजारांनी…

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 मध्ये शिवसेनेने काँग्रेससोबत जाण्याचा प्रस्ताव दिला होता, या दाव्यावरही योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरे काँग्रेससोबत जाणार नाहीत, असे वारंवार सांगत होते, असे कदम म्हणाले. काँग्रेसच्या विचारसरणीच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे कायम लढत राहिले, असा दावा त्यांनी केला. मात्र, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, अशी टीका योगेश कदम यांनी केली. 2014 मध्ये जर काँग्रेससोबत जाण्याचा विचार होता. तर बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे नव्हते का?, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची महत्त्वाची होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तर भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना योगेश कदम म्हणाले की, कोपऱ्याला गूळ लावून खेळवत ठेवायचं, अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची पद्धत आहे. सोबतचे नेते पक्ष सोडून जाऊ नयेत, यासाठी हे केविलवाणे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी त्यांना मंत्रिपद देण्याचा शब्द देण्यात आला होता, असा दावा कदम यांनी केला. मंत्रिपद दिले गेले नाही, तर मुख्यमंत्रीपद कुठून देणार?, असा सवाल योगेश कदम यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची भाषा करत होते. मात्र मुख्यमंत्रीपद स्वतःकडेच ठेवले, अशी टीका त्यांनी केली. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे राजकारण मुंबईच्या बळावर सुरू होते. मात्र मुंबईतीलही त्यांचे बळ आता कमी झाले आहे, असा दावा कदम यांनी केला. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि पुढेही राहील, असे योगेश कदम यांनी ठामपणे सांगितले. सामान्य शिवसैनिक आमच्या सोबत असल्याचा दावा करत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा सुपडा साफ झाला, अशी टीका त्यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number