World Highest Tunnel : चीन सीमेवर भारत बांधत आहे जगातील सर्वात उंच बोगदा; ‘शिंकुन ला टनेल’मुळे लडाखची कनेक्टिव्हिटी होणार मजबूत

हिमाचल प्रदेश आणि लडाख या दोन महत्त्वाच्या भागांना जोडण्यासाठी भारत सरकारने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.
World Highest Tunnel : चीन सीमेवर भारत बांधत आहे जगातील सर्वात उंच बोगदा; ‘शिंकुन ला टनेल’मुळे लडाखची कनेक्टिव्हिटी होणार मजबूत

Shinku La Tunnel : हिमाचल प्रदेश आणि लडाख या दोन महत्त्वाच्या भागांना जोडण्यासाठी भारत सरकारने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. शिंकुन ला दर्रेच्या खाली तब्बल 15,800 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच 'मोटरेबल' बोगद्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचे काम 26 जुलै 2024 रोजी सुरू झाले असून, ऑगस्ट 2028 पर्यंत तो पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 4.1 किमी लांबीचा हा ट्विन-ट्यूब बोगदा पूर्ण झाल्यानंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल, कारण हा जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्ते मार्ग ठरेल.

बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनची मोठी जबाबदारी
या महत्त्वाच्या बोगद्याच्या बांधकामाची जबाबदारी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) कडे सोपवण्यात आली आहे. 'प्रोजेक्ट योजक' अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे हिमाचल प्रदेशातील लाहौल खोरे आणि लडाखमधील जंस्कार खोरे एकमेकांना जोडले जातील. निमू-पदम-दारचा या रस्त्यावरून वर्षभर विनाअडथळा वाहतूक सुरू राहावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे तुटणारा संपर्क या बोगद्यामुळे कायमस्वरूपी जोडला जाणार आहे.

हेही वाचा – Passport Index 2026: भारतीय पासपोर्टच्या मानांकनात मोठी घसरण; 'इतक्या' देशांत मिळणार व्हिसा फ्री एन्ट्री

सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या बोगद्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक 500 मीटर अंतरावर 'क्रॉस-पॅसेज' तयार केले जात आहेत. हे क्रॉस-पॅसेज म्हणजे दोन समांतर मुख्य बोगद्यांना जोडणारे छोटे मार्ग असतात, ज्यांचा वापर आपात्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी किंवा देखभालीच्या कामासाठी केला जातो. अशा प्रकारच्या सुविधेमुळे कोणत्याही अपघाताच्या वेळी प्रवाशांना एका बोगद्यातून दुसऱ्या सुरक्षित बोगद्यात जाणे सोपे होईल.

सीमेवर सामरिक ताकद आणि आर्थिक विकास
शिंकुन ला टनेलच्या उभारणीसाठी एकूण 1681 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चीनच्या सीमेजवळ असल्याने हा बोगदा लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे भारतीय सशस्त्र दलांना आणि अवजड युद्धसामग्रीला सीमेपर्यंत जलद गतीने पोहोचवणे सोपे होईल. केवळ लष्करीच नव्हे, तर या प्रकल्पामुळे लडाखमधील स्थानिक लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे, ज्यामुळे दुर्गम भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

हेही वाचा – Fine To Defence Secretary: संरक्षण सचिव आणि सेना प्रमुखांना ठोठावला 2 लाख रूपयांचा दंड; न्यायालयाचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version