Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू! फडणवीसांचा पुढाकार, व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडकलेल्या नागपूरच्या नागरिकांच्या परतीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे.

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू! फडणवीसांचा पुढाकार, व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद

नेपाळमध्ये अचानक निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अनेक पर्यटक आणि नागरिक तेथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अत्यंत जलद गतीने पावले उचलत मदतकार्याला सुरुवात केली आहे. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडकलेल्या नागपूरच्या नागरिकांच्या परतीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर प्रवाशांना काठमांडूहून पुढे जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध झाली आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा पुढचा प्रवास सुरू झाला असून हे सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.

नागपूरचे सर्व 106 प्रवासी काठमांडूवरून दानापूर (बिहार) करिता सुखरुप निघाले आहेत. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसोबत व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर काठमांडूवरून जनकपूरपर्यंत नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी या प्रवाशांच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे. 

हेही वाचा- Girish Mahajan: ‘घाबरू नका, सरकार खंबीरपणे पाठीशी…’; नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी गिरीश महाजन यांचा थेट संवाद

त्यांना स्थानिक 4 मिनी बस करून दिल्या. हे सर्व लोक जनकपूर (बिहार) बॉर्डरला आज सकाळी पोहोचणार आहेत. हे 106 प्रवासी जनकपूरमार्गे बिहार सीमेवर पोहोचल्यानंतर त्यांना दानापूरपर्यंत नेण्यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दानापूर येथे पोहोचल्यानंतर पुढील प्रवासासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून त्याद्वारे या प्रवाशांना सुरक्षितपणे नागपूरला परत आणण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील 11 विद्यार्थी नेपाळमध्ये सुखरूप असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पेठ येथील 11 विद्यार्थी पर्यटनासाठी नेपाळला गेले होते. सध्या सर्व विद्यार्थी काठमांडूमध्ये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांचा नेपाळ दूतावासाशी संपर्क झाला असून दूतावासाकडून विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत नाशिक प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. 

राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन: 1070 (टोल-फ्री क्रमांक)
दरम्यान, नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात येत आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
•नियंत्रण कक्ष +91-9321587143
•अधिकृत ई-मेल: controlroom@maharashtra.gov.in
महाराष्ट्रातील नागरिक कुठे अडकले असतील, तर त्यांनी खालील लिंकवर आपली माहिती अपलोड करावी.
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number