Router Placement: आजच्या डिजिटल युगात वेगवान इंटरनेट ही केवळ लक्झरी नाही तर एक मूलभूत गरज झाली आहे. ऑनलाइन क्लासेस, वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉल्स, गेमिंग, ओटीटी स्ट्रीमिंग या सगळ्यासाठी इंटरनेटवरच अवलंबून राहावं लागतं. पण अनेकदा लोकांना तक्रार असते की Wi-Fi नीट चालत नाही किंवा स्पीड अचानक कमी होतो. आपल्याला वाटतं की ही समस्या इंटरनेट पुरवठादाराकडून (ISP) आहे, पण प्रत्यक्षात दोष आपल्या घरातील काही गोष्टींमध्ये दडलेला असतो.
Wi-Fi सिग्नल हे रेडिओ वेव्ह्जवर चालतात. या वेव्ह्जना अडथळे मिळाले तर सिग्नलची ताकद कमी होते आणि परिणामी इंटरनेट स्पीड घटतो. चला तर पाहूया, कोणत्या वस्तू राउटरजवळ ठेवल्याने नेटवर्कवर वाईट परिणाम होतो.
जाड भिंती आणि मोठं फर्निचर
जर राउटर आणि मोबाईल-लॅपटॉपच्या मध्ये जाड भिंती, कपाटं किंवा मोठं फर्निचर असेल तर Wi-Fi सिग्नल कमकुवत होतो. विशेषतः काँक्रीटच्या किंवा लोखंडी भिंती सिग्नल सर्वात जास्त अडवतात. त्यामुळे राउटर नेहमी घराच्या मध्यभागी किंवा मोकळ्या जागेत ठेवावा.
मायक्रोवेव आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं
मायक्रोवेव ओव्हन हा 2.4 GHz फ्रिक्वेन्सीवर चालतो, जी Wi-Fi च्या बऱ्याच सिग्नल्सशी जुळते. त्यामुळे स्वयंपाकघरात किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या जवळ राउटर ठेवला तर नेटवर्क स्लो होऊ शकतो.
पाणी: Wi-Fi चा मोठा शत्रू
पाण्यामुळे सिग्नल शोषला जातो. त्यामुळे राउटरच्या जवळ अक्वेरियम, मोठी पाण्याची ड्रमं किंवा कंटेनर असतील तर इंटरनेट स्लो होतो. पाण्याने भरलेल्या वस्तूंपासून राउटर दूर ठेवणे उत्तम.
धातू आणि आरसे
धातूचे फर्निचर किंवा स्टीलच्या वस्तू सिग्नल परावर्तित करतात तर आरसे सिग्नल कमकुवत करतात. जर राउटरच्या आजूबाजूला आरसा, धातूची आलमारी किंवा स्टीलचे सामान असेल तर नेटवर्कवर वाईट परिणाम होतो. म्हणून राउटरला धातूच्या पृष्ठभागावर ठेवणं टाळा.
ब्लूटूथ व वायरलेस गॅजेट्स
ब्लूटूथ हेडफोन्स, वायरलेस फोन किंवा इतर डिव्हाइसेस हे देखील 2.4 GHz आणि 5 GHz फ्रीक्वेन्सीवर चालतात. त्यामुळे ते Wi-Fi सिग्नलमध्ये अडथळा आणू शकतात.
काय करावं?
राउटर नेहमी घराच्या मध्यभागी व उंचावर ठेवा.
इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मायक्रोवेव, पाण्याच्या वस्तू आणि धातूपासून दूर ठेवा.
जाड भिंती किंवा फर्निचरच्या मागे राउटर ठेवू नका.
शक्य असेल तर ड्युअल बँड राउटर वापरा ज्यामुळे स्पीडवर कमी परिणाम होतो.
योग्य काळजी घेतली तर Wi-Fi नेहमी जलद चालेल आणि इंटरनेटचा अनुभव अधिक चांगला होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.