Rahul Gandhi: राहुल गांधींनी दावा केलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. हरियाणा येथे झालेल्या निवडणुकीदरम्यान एकाच महिलेच्या फोटो वापर करुन 22 वेळा मतदान करण्यात आले आहे. 22 वेळा वेगवेगळ्या नावाने हे मतदान झाले आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी दावा केलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

नवी दिल्ली: राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. हरियाणा येथे झालेल्या निवडणुकीदरम्यान एकाच महिलेच्या फोटो वापर करुन 22 वेळा मतदान करण्यात आले आहे. 22 वेळा वेगवेगळ्या नावाने हे मतदान झाले आहे. वोट चोरी प्रकरणात हा त्यांनी फोडलेला सर्वात मोठा बॉम्ब होता. ही महिला कोण? जी वेगवेगळ्या नावाने फिरत आहे. राहुल गांधी यांनी ही ब्राझिलियन मॉडेल असल्याचा उल्लेख आपल्या भाषणादरम्यान केला आहे. 

या तरुणीचा फोटो अनेक वेबसाईटने वापरला आहे. मात्र तिचे नाव समजू शकले नाही. या फोटोला फेसबुक आणि इतर साइटवरही वापरण्यात आले आहे. गुगलवर हा फोटो मागील पाच वर्षांपासून दिसत आहे. कधी मॉडेल म्हणून तर कधी फॅशन किंवा हेअरस्टाइलसाठी प्रमोशन म्हणून हा फोटो वेगवेगळ्या साईट्सने वापरला आहे. 

हेही वाचा: Rahul Gandhi : 'हरियाणात तब्बल 25 लाख बनावट मतदार'; राहुल गांधींचा धक्कादायक दावा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या महिलेचा उल्लेख केला आहे, ती ब्राझिलियन मॉडेल असल्याची बातमी आहे. त्या महिलेचे नाव मॅथ्यूस फेरो नाही. मॅथ्यूस फेरो हे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचे नाव आहे.  या फोटोवर कोणतीही रॉयल्टी नाही. त्यामुळे कुणीही हा फोटो वापरत आहे. त्यावर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. हा फोटो साधारण आठ ते नऊ वर्षांपूर्वी काढला असावा, असा अंदाज आहे. हा फोटो असंख्य युट्युब व्हिडीओंमध्ये आणि उत्पादनांसह ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाइटवर वापरला जात आहे. 

राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानुसार गूढ मुलीचा हरियाणात 22 वेळा मतदान केलं. काही मतदान केंद्रांवर एकाच महिलेचा फोटो सीमा, सरस्वती आणि विमला अशा वेगवेगळ्या नावांनी दिसला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या टीमला 10 वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर एकच फोटो आणि नाव पाहून आश्चर्य वाटले.       

राहुल गांधी म्हणाले, "जेव्हा त्यांनी या गूढ मुलीचा फोटो त्यांच्या टीमला दाखवला, तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. चौकशी केल्यानंतर त्यांना आढळले की तो एका ब्राझिलियन मॉडेलचा स्टॉक फोटो होता. त्यांनी सांगितले की, हा एक परदेशी/स्टॉक फोटो होता, खऱ्या स्थानिक मतदाराचा नाही. ती प्रत्यक्षात ब्राझिलियन मॉडेल होती आणि तिच्या फोटोचा वापर करून वेगवेगळे बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले होते, ज्याचा वापर हरियाणात बावीस ठिकाणी मतदान करण्यासाठी वापरण्यात आला होता.

गांधी यांनी म्हटले की, या पद्धतीने हरियाणात 25 लाख लोकांनी बनावट मतदान केले होते. हरियाणात 25 लाख बनावट मते टाकण्यात आली, याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. दर आठ मतांपैकी एक मत बनावट आहे. तरीही काँग्रेस फक्त 25 हजार मतांनी निवडणूक हरला.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number