Weekly Horoscope 16 November To 22 November 2025 : ‘या’ आठवड्यात काही राशींना अपार यश मिळण्याची शक्यता आहे; वाचा सविस्तर साप्ताहिक राशिभविष्य

या आठवड्यात सिंह राशीचे लोक घराशी संबंधित नवीन योजना बनवतील. धनु राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते.

Weekly Horoscope 16 November To 22 November 2025 : ‘या’ आठवड्यात काही राशींना अपार यश मिळण्याची शक्यता आहे; वाचा सविस्तर साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope : या आठवड्यात, म्हणजे 16 ते 22 नोव्हेंबर, मेष राशीच्या लोकांसाठी वेळ अनुकूल राहील. त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. मिथुन राशीचे लोक तणावमुक्त राहतील. सिंह राशीचे लोक घराशी संबंधित नवीन योजना बनवतील. धनु राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांना त्यांचे अडकलेले पैसे मिळू शकतात. जाणून घ्या कसा असेल हा आठवडा सर्व 12 राशींसाठी.

मेष : वृश्चिक राशीत सूर्य राश्यांतर, चंद्र, शुक्र युती. क्षेत्र कोणतेही असो मैत्रीचे धोरण ठेवा. काम करताना करताना कायदा पाळा. शब्द जपून वापरा. व्यवसायात उतावळेपण नको. वरिष्ठांना दुखवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. 

शुभ दिवस : मंगळवार, बुधवार 
शुभ रंग : नारंगी 

वृषभ : मिथुन – वृश्चिक राशीत सूर्य राश्यांतर, सूर्य गुरू त्रिकोणयोग. सप्ताहाच्या मध्यावर जवळच्या व्यक्ती समवेत तणाव, गैरसमज पोटाची काळजी घ्या. तुमच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. आत्मविश्वासात भर पडणारी घटना घडेल. 

शुभ दिवस : रविवार, सोमवार
शुभ रंग : पांढरा

मिथुन : नोकरी-धंद्यात शुभ फळे मिळतील. मनासारख्या घटना होतील. नोकरीतील राजकारण संपेल. वरिष्ठांची मर्जी राहिल. तसेच हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय-धंद्यात नवीन करार मदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येतील. 

शुभ दिवस : रविवार, शुक्रवार
शुभ रंग : हिरवा

कर्क : वृश्चिकेत सूर्य राश्यांतर, सूर्य बुध युती. तुमच्या क्षेत्रात काम करताना बुद्धिचातुर्य वापरा. अहंकार नको. कुणालाही कमी लेखू नका. तुमचे महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबाबदारी टाळून चालणार नाही.

शुभ दिवस : रविवार, सोमवार
शुभ रंग : पिवळा

सिंह : वृश्चिकेत सूर्य राश्यांतर, सूर्य गुरू त्रिकोणयोग. कोणताही किचकट प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. गोड बोलण्यावर विश्वास ठेऊ नका. नोकरीत चांगली संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. 

शुभ दिवस : रविवार, शुक्रवार
शुभ रंग : गुलाबी

हेही वाचा : Today Horoscope : 'या' राशीच्या लोकांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवावा, जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस?

कन्या : वृश्चिकेत सूर्य, राश्यांतर, चंद्र शुक्र युती. वादविवाद टाळा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. कायदा पाळा. अहंकाराने नुकसान होईल. कामात सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपमान होईल. कायद्याला धरून वक्तव्य करा.

शुभ दिवस : रविवार, सोमवार 
शुभ रंग : पांढरा 

तुळ : वृश्चिकेत सूर्य राश्यांतर, रवि बुध युती. कोणत्याही कठीण प्रश्नावर विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन उघडेल. नविन दिग्गज व्यक्तींचे परिचय होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. 

शुभ दिवस : शुक्रवार, शनिवार 
शुभ रंग : आकाशी 

वृश्चिक : वृश्चिक राशीत सूर्य राश्यांतर, रवि बुध युती. सप्ताहाच्या सुरूवातीला किरकोळ तणाव, अडचणी येतील. पुढे जाण्याची संधी मिळेल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. खरेदी-विक्रीत फायदा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कामे होतील.

शुभ दिवस : शुक्रवार, शनिवार 
शुभ रंग : भगवा

धनु : स्वराशीत सूर्य राश्यांतर, सूर्य बुध युती. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नोकरीत संधी लाभेल. गुंतवणूक वाढेल. खरेदी-विक्री करताना जास्त मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाचे कौतुक होईल.

शुभ दिवस : शुक्रवार, शनिवार 
शुभ रंग : पिवळा

मकर : वृश्चिक राशीत सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र युती. ठरविलेल्या कामात अडचणी येतील. गैरसमज वाढेल. प्रवासात काळजी घ्या. मनावर दडपण येईल. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धा करणारे वाढतील. 

शुभ दिवस : रविवार, सोमवार 
शुभ रंग : जाभंळा

हेही वाचा : Margashirsha Month 2025 : मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार? जाणून घेऊ, श्रीकृष्णाची भक्ती, महालक्ष्मी व्रत आणि दानाचे महत्त्व

कुंभ : वृश्चिक राशीत सूर्य राश्यांतर, सूर्य बुध युती. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल. समस्या सोडवण्याचे मार्ग लाभतील. नोकरीधंद्यात दिलासा देणारा काळ असेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निश्चित निर्णयाचा विचार कराल. 

शुभ दिवस : रविवार, सोमवार 
शुभ रंग : निळा

मीन: वृश्चिकमध्ये सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र युती. विचारांना चालना देणारा कालावधी. कुणालाही कमी लेखू नका. निर्णय चुकणार नाही. नोकरीमध्ये काम वाढेल. धंद्यात कामे येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल. 

शुभ दिवस : शुक्रवार, शनिवार 
शुभ रंग : नारंगी 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number