Maharashtra Local Body Election Update: नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदार प्रक्रिया पूर्ण; पहा मतदानाची आकडेवारी

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान 70 टक्क्यांच्या वर गेले. आनंद आखाडा केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने तीन वेळा मतदान थांबण्याची वेळ आली.
Maharashtra Local Body Election Update: नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदार प्रक्रिया पूर्ण; पहा मतदानाची आकडेवारी

Maharashtra Local Body Election Update: राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपद व सदस्यपदांसाठी आज दिवसभर मतदान पार पडले. सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली आणि सायंकाळी 5.30 वाजता अधिकृत वेळ संपली. तरीही अनेक मतदान केंद्रांवर शेवटच्या क्षणापर्यंत नागरिकांची गर्दी कायम राहिली. काही ठिकाणी सौम्य तणाव आणि किरकोळ धांदलही पाहायला मिळाली. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायतींसह एकूण 288 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली होती. मात्र काही प्रकरणांवरील अपीलांचे निर्णय 23 नोव्हेंबरनंतर हाती आल्याने 24 संस्थांसाठी आज मतदान घेण्यात आले. आता संपूर्ण राज्याचे लक्ष 21 डिसेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार मतमोजणी याच दिवशी होणार आहे.

हेही वाचा – Hingoli Santosh Bangar Update : आमदार संतोष बांगरांना मोठा धक्का! गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाचा उत्साह

दुपारी 3.30 वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील मतदानाचा टक्का असा:

रत्नागिरी नगरपरिषद – 44.82 टक्के

चिपळूण – 51.26 टक्के
खेड – 52.50 टक्के
राजापूर – 64.34 टक्के
लांजा नगर पंचायत – 61.57 टक्के
देवरुख – 64.55 टक्के
गुहागर – 69.12 टक्के

साताऱ्यात 49.14 टक्के मतदान

पाचगणी – 42.93 टक्के
सातारा – 43.77 टक्के
मलकापूर – 52.69 टक्के
म्हसवड – 57.20 टक्के
वाई – 53.22 टक्के
कराड – 50.50 टक्के
रहिमतपूर – 65.57 टक्के
मेढा – 73.72 टक्के

संभाजीनगर जिल्ह्यात 55.37 टक्के मतदान

कन्नड – 55.93 टक्के
सिल्लोड – 62.43 टक्के
पैठण – 52.11 टक्के
वैजापूर – 54.42 टक्के
खुलताबाद – 60.83 टक्के
गंगापूर – 44.25 टक्के

सांगली जिल्ह्यात 57.86 टक्के मतदान

इस्लामपूर – 55.93 टक्के
विटा – 56.94 टक्के
आष्टा – 61.61 टक्के
तासगाव – 54.60 टक्के
जत – 53.67 टक्के
पलूस – 59.49 टक्के
शिराळा – 66.73 टक्के
आटपाडी – 64.77 टक्के

गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 54.81 टक्के मतदान

गडचिरोली – 55.10 टक्के
देसाईगंज – 53.87 टक्के
आरमोरी – 55.34 टक्के

हेही वाचा – Vaibhav Naik On Eknath Shinde : "मालवणमध्ये शिंदेंनी पैशांच्या बॅगा आणल्या", वैभव नाईकांच्या टीकेवर दिपक केसरकर आक्रमक

त्र्यंबकेश्वरमध्ये मतदानाचा उच्चांक

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान 70 टक्क्यांच्या वर गेले. आनंद आखाडा केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने तीन वेळा मतदान थांबण्याची वेळ आली. त्यामुळे अधिकृत वेळ संपण्यापूर्वी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना मतदानाची परवानगी देण्यात आली.

वर्धा जिल्ह्यात 44.40 टक्के मतदान

दुपारी 3.30 वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यात एकूण मतदान 44.40 टक्के झाले असून, अपेक्षेपेक्षा हा टक्का कमी आहे.

पुणे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी  

पहिल्या चार तासांत पुणे जिल्ह्यात 20.22 टक्के मतदान नोंदले गेले.

सर्वाधिक मतदान – वडगाव मावळ : 28.33 टक्के
सर्वात कमी – दौंड नगर परिषद : 13.21 टक्के

दरम्यान, आज राज्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतरीत्या पूर्ण झाली असून, निकाल 21 डिसेंबर रोजी घोषित केले जाणार आहेत. त्यामुळे आता राज्यातील सर्व नागरिकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version