SIR Voter List : मतदारांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रातील 2 कोटी, दिल्लीतील 47 लाख मतदार SIR ड्राफ्टमधून वगळली? यादीत तुमचं नाव आहे का, लगेच चेक करा

महाराष्ट्र आणि दिल्लीत आज SIR अंतर्गत ड्राफ्ट वोटर रोल म्हणजे प्रारुप मतदार यादी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदारांना त्यांचं नाव यादीमध्ये आहे का नाही, हे तपासता येणार आहे.

SIR Voter List  : मतदारांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रातील 2 कोटी, दिल्लीतील 47 लाख मतदार SIR ड्राफ्टमधून वगळली? यादीत तुमचं नाव आहे का, लगेच चेक करा

महाराष्ट्र आणि दिल्लीत आज स्पेशल इन्टेन्सिव रिव्हिजन म्हणजे SIR अंतर्गत ड्राफ्ट वोटर रोल म्हणजे प्रारुप मतदार यादी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदारांना त्यांचं नाव यादीमध्ये आहे का नाही, हे तपासता येणार आहे. यावेळी SIR यादीतून राज्यातील दोन कोटी मतदारांना वगळण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. SIR 2026 अंतर्गत राज्याची नवी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. राज्यात एकूण 9,78,54,049 नोंदणीकृत मतदार होते. प्रसिद्ध झालेल्या मसुद्यात 7,71,65,562 (78.86%) मतदारांचाच समावेश होता. दरम्यान आता तब्बल 2,06,88,487 (21.14%) मतदारांची नावे सध्याच्या यादीत समाविष्ट नसल्याची माहिती समोर आली आहे.

गणना प्रपत्र न मिळाल्यामुळे, गैरहजर असणे, स्थलांतर, मृत्यू किंवा दुबार नोंदणीमुळे नावे वगळली असल्याची सूत्रांची माहिती आहे. नव्या प्रारुप यादीत पुरुष मतदारांची संख्या 3,95,89,905 तर महिला मतदारांची संख्या 3,75,72,570 तसेच तृतीयपंथी मतदारांची संख्या3,087 इतकी आहे. दावे व हरकती नोंदवण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंतचा कालावधी असून सर्व अर्जांची छाननी करून 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदारही यासाठी पात्र ठरणार आहेत. मसुद्यामध्ये नाव आलं नाही, याचा अर्थ अशा मतदारांची नावं मतदार यादीतून हटवली आहेत, असा होत नाही, असं महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे प्रमुख एस. चोकलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- NPS New Rules: नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये मोठे बदल; PFRDA कडून 5 महत्त्वाच्या अपडेट्ससह नवीन पारदर्शक नियम लागू

तुमचं नाव मसुद्यामध्ये आहे का? असं चेक करा
SIR मसुद्यामध्ये तुमचं नाव नसेल तर मसुदा प्रकाशित झाल्यानंतर आता त्यावर आक्षेप घेऊ शकता. 31 ऑगस्टपासून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आपला दावा किंवा हरकत सादर करायची आहे. या दाव्यांची निस्तरण प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदाता यादी जाहीर केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला फॉर्म 6 चा वापर करावा लागेल. फॉर्म 7 चा उपयोग नाव हटवल्याबद्दल तक्रार करण्यासाठी तर फॉर्म 8 चा वापर मतदार यादीमध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी आहे. यानुसार तुम्ही मतदार यादीत तुमच्या नावाचा समावेश करू शकता. 

तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे का? हे तपासण्यासाठी 3 लिंक
https://voters.eci.gov.in/searchInSIR/S2UA4DPDF-JK4QWODSE

https://voters.eci.gov.in/download-eroll

https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/DistrictASDD.aspx
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number