नोमानींचा व्होट जिहादचा व्हिडीओ व्हायरल

सज्जाद नोमानी यांचा व्होट जिहाद बाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ आशिष शेलार ट्वीट करुन लक्ष द्या, असे आवाहन केले आहे.
नोमानींचा व्होट जिहादचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : ‘एक ऐसा व्होट जिहाद करो… जिसके सिपेसालार है : शरद पवार.. अझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले और हमारा निशाना महाराष्ट्र नही…तो दिल्ली है…’ हे वक्तव्य आहे ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांचे… अशी माहिती देत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आलेल्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा व्होट जिहाद, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सैफ है… याची चर्चा सुरू झाली आहे. शेलारांनी व्हिडीओ ट्वीट करुन लक्ष द्या, असे आवाहन केले आहे. 

‘सज्जाद नोमानींविरोधात कारवाई करा’ 

व्होट जिहादचे आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानींविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या किरीट सोमैयांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version