Vijay Wadettiwar: कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावावरून विजय वडेट्टीवार आक्रमक; म्हणाले, ‘शेतकऱ्यांची थट्टा करणं बंद करा…’

यावेळी कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावावरून विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. <br/>
Vijay Wadettiwar: कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावावरून विजय वडेट्टीवार आक्रमक; म्हणाले, ‘शेतकऱ्यांची थट्टा करणं बंद करा…’

Vijay Wadettiwar: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी झालेल्या चर्चेत काँग्रेसचे विधानमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती  मांडली. कापूस खरेदीसाठी सीसीआयने घातलेल्या कठोर अटींमुळे शेतकऱ्यांचे कापूस विक्री केंद्रावरून परत जाऊन पडत असल्याचे त्यांनी सांगितले. कापूस खरेदीची मर्यादा कमी असून, आयात कर 12 टक्क्यांवरून थेट शून्य टक्क्यांवर आल्यामुळे परदेशी कापूस बाजारपेठेत येताच स्थानिक भाव कोसळतील, अशी गंभीर शक्यता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. यावेळी कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावावरून विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, कापसाच्या 50 गाड्यांपैकी जवळपास 40 गाड्या नाकारल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी जायचं तरी कुठे? सोयाबीन खरेदी केंद्रांचीही स्थिती काही वेगळी नाही. 5300 रुपये हमीभाव असूनही खरेदी होत नाही, अशी तक्रार त्यांनी सभागृहात केली. मंत्रालयात बसून निर्णय घेण्यात अर्थ नाही. आमच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिवारात या, खरी स्थिती दिसेल, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.  

हेही वाचा – Ravindra Chavan: दिल्लीत रात्री उशिरा राजकीय हालचाली; चव्हाण-शहा भेटीत निवडणूक रणनीतीवर मोठा निर्णय?

सोयाबीन आणि कापूस प्रश्नांवर विरोधकांचा सरकारला घेरा

वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, सोयाबीन खरेदी केंद्रांवर 70 टक्के माल परत पाठवला जात आहे. सरकारने सरसकट माल खरेदी करण्याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी. कापसावरील आयात कराबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा होणार का, याचीही त्यांनी विचारणा केली. मात्र मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तथापी, विरोधकांच्या दबावामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयावर आजच बैठक घेण्याचा आदेश दिला.

हेही वाचा – Bhaskar Jadhav : ‘वलसाडच्या आंब्याला हापूस आंब्याचा दर्जा का द्यायचा?’; भास्कर जाधव यांचा अधिवेशनात संतप्त सवाल

सभागृहात घोषणाबाजी आणि सभात्याग

सरकारने थेट सभागृहात भूमिका मांडावी, बैठक घेण्याची गरज का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. प्रतिसाद न मिळाल्याने विजय वडेट्टीवार, नाना पटोले, रोहित पवार आणि सिद्धार्थ खरात वेलमध्ये उतरले. सत्ताधाऱ्यांवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शेतकरीविरोधी सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. अखेर विरोधकांनी निषेध नोंदवत सभात्याग केला.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version