Vidhan Parishad Election 2026: महायुतीचा सर्व जागा जिंकण्याचा निर्धार; आज 11 जागांसाठी होणार मतदान, जाणून घ्या सविस्तर माहिती

महायुतीने मोठी राजकीय चाल खेळत सहा जागांवर आपले उमेदवार बिनविरोध विजयी करून घेतले आहेत.
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचा सर्व जागा जिंकण्याचा निर्धार; आज 11 जागांसाठी होणार मतदान, जाणून घ्या सविस्तर माहिती

राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. मात्र मतदानाची औपचारिक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच महायुतीने मोठी राजकीय चाल खेळत सहा जागांवर आपले उमेदवार बिनविरोध विजयी करून घेतले आहेत. या यशामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी महायुतीत आनंदाचे वातावरण आहे.

उर्वरित जागांसाठी आज सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना येथे मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी 22 जून रोजी करण्यात येणार आहे.

हेही वाचा – Operation Tiger: पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर सावरलेल्या ठाकरेंच्या संसदेतील ताकदीला शिंदेंचा पुन्हा सुरुंग; 'या' 7 'संजय' नावांनी केला घात 

कोणते मतदार संघ
नाशिक, जळगाव, सातारा- सांगली, नांदेड, सोलापूर, भंडारा – गोंदिया, अमरावती, धाराशिव- लातूर-बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर-जालना, नागपूर.

हेही वाचा – Shivsena Operation Tiger : ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी! 19 तारखेला करणार महत्त्वाची घोषणा; काय आहे नवी अपडेट?

बिनविरोध निवड झालेले आमदार

रवींद्र फाटक (ठाणे), अनिकेत तटकरे (कोकण), विक्रम काकडे (पुणे), प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर), दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ) आणि अरुण लखाणी (वर्धा- गडचिरोली- चंद्रपूर)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version