Malegaon Namaz Pathan : मालेगावच्या विद्युत विभागात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; विधीमंडळात खडाजंगी

मालेगावातील महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद थेट विधीमंडळात पडत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

Malegaon Namaz Pathan : मालेगावच्या विद्युत विभागात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; विधीमंडळात खडाजंगी

मालेगावातील महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद थेट विधीमंडळात पडत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मालेगावमधील संबंधित प्रभागात अनेक दिवसांपासून रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील पथदीप बंद असल्यामुळे रात्री अपघात, चोरी व असुरक्षिततेची भीती तेथील नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

हेही वाचा- Rohit Pawar : “पुढील 48 तासात सर्वकाही उघड करणार” दादांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांची आक्रमक भूमिका

यादरम्यान बंद असलेले पथदीप सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी केली होती. महापालिकेच्या विद्युत विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने, आता लोक संघर्ष समितीचे लुकमान कमाल यांच्यासह प्रभागातील काही मुस्लिम नागरिकांनी महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात सामूहिक नमाज पठण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नमाजाची वेळ झाल्याने नागरिकांनी कार्यालयातच नमाज अदा केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान यासंदर्भात भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या घटनेची गंभीर दखल घेत कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा- Mumbai, Rat Poison On Fruits : धक्कादायक! नफ्यासाठी फळविक्रेत्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल
तसेच भाजप नेते नितेश राणे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राणे म्हणाले की, “निवडणूक आधी असे लोक जय मीम जय भीम बोलतात पण निवडणुकीनंतर बाबासाहेबांना विसरतात. संविधानात नमाज पठणला कुठे मान्यता आहे. नामाजला मशीद बंद आहे का? आम्हीही गीता वाचायला सुरुवात करू मग हिरव्या सापांनी बोलू नये.. मदरसे हवेत कशाला? मदरसे आतंकवादी चालवतात… आम्ही शाळांमध्ये भगवत गीता शिकवू… मदरशांचे लाड कशाला करायचे… महाराष्ट्रातील मदरसे आतांकवाद्यांचे अड्डे ; सगळे मदरसे बंद करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे..”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number