Chitra Wagh : सोनिया गांधींना पुस्तक पाठवलं, वडेट्टीवारांनी वेडी म्हटलं, चित्रा वाघ यांचं सणसणीत उत्तर; ‘वंदे मातरम्’ मुद्द्यावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने

मुंबई : स्वातंत्र्यदिनादिवशी दिल्लीत झेंडा वंदनावेळी सोनिया गांधींनी वंदे मातरम् हे राष्ट्रगीय मधेच थांबवलं होतं. या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींना राष्ट्रगीताचे पुस्त पाठवले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावतं, त्यांना वेडी असे म्हटले आहे. त्यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनीही सडेतोड उत्तर देत वंदे मातरम्च्या सन्मानासाठी मी […]

Chitra Wagh : सोनिया गांधींना पुस्तक पाठवलं, वडेट्टीवारांनी वेडी म्हटलं, चित्रा वाघ यांचं सणसणीत उत्तर; ‘वंदे मातरम्’ मुद्द्यावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने

मुंबई : स्वातंत्र्यदिनादिवशी दिल्लीत झेंडा वंदनावेळी सोनिया गांधींनी वंदे मातरम् हे राष्ट्रगीय मधेच थांबवलं होतं. या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींना राष्ट्रगीताचे पुस्त पाठवले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावतं, त्यांना वेडी असे म्हटले आहे. त्यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनीही सडेतोड उत्तर देत वंदे मातरम्च्या सन्मानासाठी मी १०० वेळा वेडी व्हायला तयार आहे, असे म्हटले आहे.

चित्रा वाघ यांनी नमूद केले की, एका भारतीय स्त्रीने सोनिया गांधींना वंदे मातरमच पुस्तक पाठवून राष्ट्रगानासाठी सन्मान राखायला सांगण हा विजय वडेट्टीवार यांच्या दृष्टीने वेंधळेपणा ठरतो का? वंदे मातरम् चा अपमान सहन न होणे, जर वेडेपणा असेल तर होय मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे. पहिली गोष्ट मला वेडी, वेंधळी म्हणणारे तुम्ही किती वैचारिकदृष्ट्या कंगाल आहात. हे तुमच्या नीच भाषेतून महाराष्ट्राला दिसलंय. दुसरी गोष्ट माझ्या नवऱ्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुमचा तोल पूर्णपणे गमावला आहे. ज्या न्यायालयावर देशाचा विश्वास आहे, त्या न्यायालयाने माझ्या पतीला निर्दोष मुक्त केलयं.

हेही वाचा : IAS Transfer: प्रशासकीय फेरबदल! मध्यरात्री 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाच जिल्ह्यांना मिळाले नवे जिल्हाधिकारी

न्यायव्यवस्थेचा निर्णय मान्य करण्याची अक्कल तुमच्यात आहे का? की सोनिया गांधींची चाटूगिरी करताना देशाच्या न्यायालयाचा विसर पडलायं. माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलयं. पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. अहो, राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला, तर तुम्ही माझ्यावर कुटुंबावर घसरलात. यावरुन सिद्ध होतं की, वंदे मातरमचा आदर करण्याची दानत तुमच्यात नाही. विजय विजय वडेट्टीवार तुमची ही असभ्य भाषा, खोटे आरोप मला गप्पा करु शकत नाही. सोनिया गांधी यांना वंदे मातरमचं पुस्तक पाठवलं. आता तुम्हाला मी भारतीय संविधानाची प्रत पाठवते ती नीट वाचा आणि मगचं बंद थोबाड उघडा, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number